Rupali Chakankar
Rupali Chakankar Sarkarnama
पुणे

Rupali Chakankar News: रुपाली चाकणकरांचा फोटो 'त्या' पेजवर; गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

Rupali Chakankar News : राज्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे फोटो सोशल मिडीयावरील अश्लील वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी सायबर सेलने गुन्हा दाखल करुन घेत तपास सुरु केला आहे. (Rupali Chakankar's photo on 'that' page; Filed a case)

सोशल मिडीयावरील एका पेजवर काही महिलांचे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत, त्याच पेजवर चाकणकरांचेही फोटो आढळून आले आहे. चार दिवसांपूर्वीच काही समाजकंटकांनी हे फोटो अपलोड केले आहेत. (Crime News)

या प्रकरणी चाकणकरांनी महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव (yashasvi yadav) यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या या तक्रारीवरुन सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचाच फोटो अशा पेजवर कोणी अपलोड केला, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT