Sachin Ahir News Sarkarnama
पुणे

Sachin Ahir News : 'निवडूनच कसा येता म्हणणाऱ्या दादांच्या मांडीवर जाऊन बसले... ; अहिरांनी शिवतारेंना डिवचलं!

Pune Political News : निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना या काळात वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखविले जाईल.

Chaitanya Machale

Pune News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मदतीने सत्तेत बसलेल्या राज्यातील सरकारला खाली खेचण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचा, असा संकल्प महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आला. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने राज्यात पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले, यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोठी सहानुभूती मिळत आहे.

केवळ सहानुभूती मिळत आहे म्हणून हवेत राहून चालणार नाही, तर या सहानुभूतीचे रूपांतर मतांमध्ये करण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सदैव तत्पर राहावे, अशी सूचना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना केली. (Latest Marathi News)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात झाली. गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालयात झालेला या बैठकीसाठी खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्यासह सेनेचे शहर प्रमुख संजय मोरे (Sanjay More) उपस्थित होते.

निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना या काळात वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखविले जाईल. मात्र, या आमिषांना बळी न पडता ही निवडणूक कशी जिंकता येईल यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही निवडणूक कोणत्याही निधीसाठी नव्हे तर निष्ठेसाठी लढायची आहे, असे अहिर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुरंदर तालुक्यात ज्यांच्या विरोधामुळे पक्ष सोडला तेच आता राष्ट्रवादीच्या (NCP) दादाच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, अशा शब्दांत अहिर यांनी माजी आमदार विजय शिवतारे यांचे नाव न घेता टीका केली. ज्यांना झोप येत नाही त्यांची आता त्यांच्याच पक्षाचे लोक इंदापुरात झोप उडवू लागले आहेत.

शिरूरमध्ये तर दुसऱ्या पक्षात असूनही उमेदवारीसाठी ते गाड्यांमध्ये फिरत आहेत. उद्या गाडी पुसायला देखील कमी करणार नाही, अशा शब्दात अहिर यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshavardhan Patil) यांचे नाव न घेता टीका केली.

कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवा -

प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांला चांगली वागणूक मिळायला हवी, अशी अपेक्षा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यावर 'महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवला जाईल,' अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 'आपण सर्व एक आहोत. एक कोणी पक्षाचा उमेदवार नाही, तर आपण सर्वजण 48 जागा लढवित आहोत, असे समजून काम करू, असेही त्या म्हणाल्या.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT