Amol Mitkari : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आल्याने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला होता. महाविकास आघाडीची मते फुटल्याने भाजचे आमदार प्रसाद लाड यांचा विजय झाला तर कॅाग्रेसचे (Congress) चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्कारावा लागला होता.
या निवडणुकीसंदर्भात भाष्य करतांना राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी या निवडणुकीत एका पक्षाची तीन मते फुटल्याचे सांगत या निवडणुकीत झालेल्या घोडेबाजार झाल्याचा आरोप केला. आणि आमदारांना दिल्या गेलेल्या पैशाचा हिशोब केला. मात्र हिशोब करतांना गडबड झाल्याने माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मिटकरींच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत "जागतिक गणित तज्ञ म्हणून मिटकरींची यांची नोबेल पारितोषिकासाठी राष्ट्रवादीकडून नाव जाहीर," असा खोचक टोला लगावला आहे. (Amol Mitkari,Sadabhau khot Latest News)
मिटकरी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात विधान परिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाचे तीन मते फुटल्याचे म्हटले म्हणत एका आमदाराला 7 कोटी असे तीन आमदारांना 21 कोटी दिले गेलेल्याचे म्हटले. मग निवडून येण्यासाठी 27 मते लागतात तर मग हिशोब करतांना त्यांनी 27 गुणिले 3 असा हिशोब करतांना 161 कोटी असे बोलले. त्यांच्या याच चुकलेल्या हिशोबावरून खोतांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.
मिटकरींचं बोलतांना गणित चुकल्याने त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरलं झाला. यामुळे विरोधकांकडून त्यांना ट्रोल केले जात आहे. यामध्ये खोतांनीही हा व्हिडिओ ट्विट करत जागतिक गणित तज्ञ म्हणून अमोल मिटकरी यांची नोबेल पुरस्कारासाठी राष्ट्रवादीकडून नाव जाहीर, अस ट्वीट करत मिटकरींना डिवचलं आहे.
मिटकरींनी निवडुण येण्यासाठी किती खर्च करावा लागतो, असे सांगतांना आपल्या जमिनीची किंमत ५ लाख एकर आहे. ४ एकर विकल्यावर २० लाख येतात, असे सांगत या निवडणुकीत पैशांचा घोडेबाजार झाल्याचे सांगितले. मात्र, सध्याच्या श्रीमंत निवडणुकीत विधान परिषदेसारख्या सभागृहात मला एकही रुपयाही खर्च न करता आमदार होता आले ते केवळ अजित पवार यांच्यामुळेच, असेही त्यांनी बोलतांना सांगितले. तसेच राज्यातील २ मंत्र्यांचे सरकार लवकरच कोसळेल आणि कार्तिकी एकादशीची पूजा ही उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते असते पण मध्यवर्ती निवडणूका लागल्या तर पांडुरंगाची पुजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार करतील, असेही मिटकरींनी यावेळी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.