Sadabhau Khot
Sadabhau Khot Sarkarnama
पुणे

Sadabhau Khot : राज्यकर्ते हे रेड्यांचीच औलाद : सदाभाऊ खोतांंचं वक्तव्य!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सर्वच राज्यकर्त्यांना उद्देशून कठोर शब्दात टिका केली आहे. राज्यसेवा आयोगाची म्हणजेच एमपीएसीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजकारण्यांवर टिकास्त्र सोडले आहे. "राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असते. त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत, असे विधान सदाभाऊ खोत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले.

सदाभाऊ म्हणाले, राज्यकर्त्यांना सर्वात जास्त भिती ही, डोक्यांची भीती वाटत असते. कारण जिकडे जास्ती डोकी, तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. कारण राज्यकर्ते बोलायला लावायचे असतील तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे रेड्याच्या पाठीवर हात ठेवावे लागतील. कारण राज्यकर्ते हे रेड्यांचीच औलाद असते, राजकर्त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत, असे विधान सदाभाऊ खोत यांनी केले.

राज्यसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणाऱ्या परिक्षार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी सदाभाऊ पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गावगाड्यातली पोरं मोठ्या अपेक्षेने अभ्यासासाठी भारत सोडून इंडियात आलेले आहेत. इंडिया अशासाठी म्हंटलो की, या देशातच भारत आणि इंडीया असे दोन देश आहेत, असे सदाभाऊ म्हणाले.

आम्ही तुमच्या पाठीशी नेहमीच आहोत. सरकारमधली माणसं तुमच्या सोबत आहे, मी ही सरकारच्या बरोबरचा माणूस आहे, तुमचं म्हणणं मी सरकारपर्यंत पोहचवीन, असे सदाभाऊंनी यावेळी आश्वासन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT