NCP New president Sakal-Saam TV Survey :  Ajit Pawar
NCP New president Sakal-Saam TV Survey : Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Sakal-Saam Survey : अजित पवार भाजपसोबत गेले तर स्थिर सरकार मिळेल का? सकाळ-साम सर्व्हे काय सांगतो?

Chetan Zadpe

NCP New president Sakal-Saam TV Survey : राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करतील, अशी चर्चा मागील आठवड्यात राजकीय वर्तुळात होत होती. अशा आशयाच्या बातम्या देखील माध्यमात झळकत होत्या. अजित पवारांनी मात्र यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे सांगत सर्व शक्यतांना फेटाळून लावले होते.

याच पार्श्वभूमीवर 'सकाळ- साम'ने सर्वेक्षण केले आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत राजकीय संधान बांधले तर महाराष्ट्रात काय स्थिती असेल? असा प्रश्न या सर्व्हेक्षणातून विचारण्यात आला होता. याबाबत आता लोकांचा संभाव्य कल समोर आला आहे.

अजित पवार यांनी भाजपसोबत जावून सरकार स्थापन केले तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल का? असा प्रश्न 'सकाळ-साम' सर्व्हेक्षणात विचारण्यात आला होता. यावर लोकांचे कल समोर आले आहे. ५९.६ टक्के लोकांनी अजित पवार - भाजप सरकार स्थिर नसेल, असे सांगत नाही म्हंटले आहे. तर केवळ २० टक्के लोकांनी याबाबत सकारात्मकता दर्शवत, हो असे उत्तर दिले. तर २०.३ टक्के लोकांनी काहीच सांगता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपसोबत राजकीय संधान बांधणार असल्याचा चर्चांना मागील आठवड्यात उधाण आले होते. त्यामुळे काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी अजित पवार होते. मात्र असे संभाव्य सत्तेचे समीकरण बहुतांश लोकांना पसंत नसल्याचे 'सकाळ-साम' सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT