Sambhaji Bhide sarkarnama
पुणे

Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला विरोध; दौंडमध्ये २५ भीमसैनिकांवर गुन्हा दाखल

Daund News : दौंड पोलिसांनी केलेली कारवाई ही चुकीची असल्याचा आरोप..

सरकारनामा ब्यूरो

Daund News: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचा पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला स्थानिक भीमसैनिकांनी विरोध केला होता. त्यानंतर याप्रकरणी भिडे समर्थकांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दौंड येथे शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला भीम सैनिकांनी विरोध केल्यामुळे त्यांच्याविरुध्द पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकऱणी २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याचवेळी आंबेडकरी चळवळीतील पदाधिकार्यांनी दौंड पोलिसांनी केलेली कारवाई ही चुकीची असल्याचा आऱोप केला आहे. या कारावाई विरोधात भीमसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. संबंधित पोलिसांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी या भीमसैनिकांनी केली आहे.

संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांचा पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र,या कार्यक्रमाला उपस्थिती न लावता भिडे हे पुढील नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले. यावेळी भिडे समर्थक आणि भीम सैनिक अशा दोन्ही बाजूने दौंड शहरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काहीवेळ वातावरणात तणाव देखील निर्माण झाला.

याबाबत अश्विन वाघमारे म्हणाले, दौंड पोलिसांनी भीमसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे संबंधित दौंड पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीमसैनिकांनी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT