Sambhaji Bhide Sarkarnama
पुणे

Sambhaji Bhide News : '..त्या महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये' ; संभाजी भिडेंच्या विधानाने पुन्हा वाद उफळण्याची चिन्हं!

Sambhaji Bhide on Vatpurnima Puja : दरवर्षी संभाजी भिडे आणि 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संघटनेचे कार्यकर्ते पालखीमध्ये सहभागी होत असतात. या वर्षीही यासाठी ते पुण्यात दाखल झाले आहेत.

Sudesh Mitkar

Sambhaji Bhide at Pune News : पुण्यामध्ये वारी आली असताना या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संभाजी भिडे पुण्यात दाखल झाले आहेत. या दरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील त्यांची अनेक वक्तव्य वादग्रस्त ठरलेली आहेत.

दरवर्षी संभाजी भिडे आणि 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संघटनेचे कार्यकर्ते पालखीमध्ये सहभागी होत असतात. यावर्षी देखील भिडे या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुण्यात दाखल झाले असून, पोलिसांनी त्यांना नोटीस दिली आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान कायदा, सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची सूचना त्यांना या नोटीसीद्वारे पोलिसांकडून देण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी संभाजी भिडे(Sambhaji Bhide ) आणि त्यांचे समर्थक हातात शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी झाले होत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही खबरदारीची नोटीस देण्यात आली आहे.

दरम्यान पालखी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेले संभाजी भिडे म्हणाले, वारकरी आणि धारकरी संगम कार्यक्रम आपल्याला आज करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन उभारण्याचं स्वप्न देखील साकार करायचं आहे.

गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या सात मातांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत. या व्रताची पथ्य आहेत. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं आपल्याला तयार करायची आहेत.

प्रत्येक तालुक्यात आपल्याला 10 हजारांची तुकडी करायची आहे. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली अशा 10 - 10 हजरांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणारं. असल्याचे देखील भिडे यांनी सांगितले.

याशिवाय भिडे पुढे संभाजी भिडे म्हणाले, वटसावित्रीच्या पूजेला अभिनेत्रींनी किंवा ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. फक्त साडी घातलेल्या महिलांनी वटसावित्रीची पूजा करावी.' असं भिडे गुरुजी म्हणाले या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT