Kulvidar Kaur, Kangna Ranaut Sarkarnama
पुणे

Kangna Ranaut : कंगनाला मारणाऱ्या 'तिचा' संभाजी ब्रिगेड करणार सत्कार!

Lok Sabha Election : कंगना यांनी तक्रार देताच कौर यांना लगेच सस्पेंड करण्यात आले. त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.

Uttam Kute

Pune Political News : खासदार म्हणून निवडून आल्यानंतर दोनच दिवसांत कंगना रनौत या वादग्रस्त अभिनेत्रीच्या कानशिलात लगावली गेल्याची खळबळजनक घटना चंदीगड विमानतळावर घडली. केंद्र सरकारच्या ३ शेतकरी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनात महिला शंभर-शंभर रुपये घेऊन बसत होत्या, असे आक्षेपार्ह विधान कंगना यांनी केले होते. त्याचा निषेध त्या आंदोलनात बसणाऱ्या शेतकरी महिलेच्या कन्या आणि सीआय़एफच्या महिला जवान कुलविंदर कौर यांनी कंगनाचे थोबाड रंगवून केला.

देशातील विमानतळांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सीआयएसएफकडे आहे. त्या दलात कौर 2009 मध्ये महिला जवान तथा कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्या. 2021 पासून चंदीगड विमानतळावर त्या काम करीत आहेत. 4 जूनला लोकसभेचा निकाल आला. त्यात हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून कंगना य भाजपकडून विजयी झाल्या. त्यानंतर 6 तारखेला त्या दिल्लीला विमानाने निघाल्या होत्या. त्यावेळी वरील घटना घडली. तिचे पडसाद देशभर सध्या सुरु आहेत. कौर यांना सोशल मीडीयातून मोठा पाठिंबा मिळतो आहे. तर, कंगना या पुन्हा एकदा ट्रोल झाल्या असून चित्रपट सृष्टीतूनही कोणी अद्याप त्यांच्या समर्थनार्थ आलेला नाही वा या घटनेचा निषेधही केलेला नाही.

दरम्यान, कंगना Kangna Ranaut यांनी तक्रार देताच कौर यांना लगेच सस्पेंड करण्यात आले. त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. कौर यांच्या निलंबनाची बातमी समजताच त्यांना प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल ददलांनी यांनी नोकरी देण्याचे आश्वासन लगेच दिले. आपण हिंसाचाराचे समर्थन करीत नाही, पण कौर यांचा राग समजू शकतो, असे त्यांनी आपल्या इन्टाग्राम स्टोरीत म्हटले आहे. तसेच तुमची आई शंभर रुपयांत आंदोलनासाठी उपलब्ध असते, असे कोणी म्हटले, तर तुम्ही काय कराल, अशी विचारणाही त्यांनी केली. दुसरीकडे फिल्म इंडस्ट्रीतून या घटनेवर चुप्पी साधली जाण्यावर कंगना यांनी आश्चर्य व्यक्त करीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

संभाजी ब्रिगेड करणार कौरचा सत्कार

नवनिर्वाचित खासदार तथा बॉलिवूड अभिनेत्री कंगना यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कौर यांचा संभाजी ब्रिगेड सत्कार करणार आहे. त्यांना हवी ती मदतही देणार आहे. कौर या पंजाबच्या सुल्तानपूर लोधी येथील रहिवासी असून मोहालीत वास्तव्यास आहेत. त्यांच्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेड उतरली आहे. त्यांना इकडे येणे शक्य नसेल, तर चंदीगड वा पंजाबला जाऊन आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू, असे संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष सतीश काळे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, कार्याध्यक्ष वैभव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सचिव रावसाहेब गंगाधरे यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT