Sambhaji Brigade | Santosh Shinde
Sambhaji Brigade | Santosh Shinde Sarkarnama
पुणे

लाल महालातील नाचगाणी आणि रिल्सविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; कारवाईची मागणी

सरकारनामा ब्युरो

Samabhaji briged latest news

पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पुणे महानगरपालिकेने (PMC) लाल महाल बंद ठेवला आहे. हजारो पर्यटक लाल महालाला भेट देण्यासाठी येत असतात. पण काहीना काही कारणाने पुणे महानगरपालिकेने आणि महालाच्या सुरक्षा रक्षकांनी लाल महाल (Lal Mahal) पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. असे असताना लाल महालात रिल्सच्या निमित्ताने चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर आधारित शुटींग करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड संघटनेने यावर आक्षेप घेतलाअसून रिल्सचे शुटींग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. ''मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केला आहे. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा,'' अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी केली आहे.

जिजाऊ-शिवरायांची अस्मिता म्हणजे तो लाल महाल आहे. हजारो शिवप्रेमी लाल महालात जाऊन नतमस्तक होत असतात. त्याच ठिकाणी लाल महाल बंद असताना चित्रपटाची घाणेरडी गाणी चित्रीत करून लाल महाल बदनाम केला जात आहे. ज्या जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालून हे पुणे वसवलं, त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणं हे निषेधार्ह आहे. हा लाल महालाचा अवमान असल्याचं संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

- लाल महालाचा सुरक्षा रक्षक निलंबित

दरम्यान, कुलदीप बापट यांनी या रिल्सचे चित्रीकरण केले असून त्यात वैष्णवी पाटील यांनी नृत्य केलं आहे. पण परवानगी नसताना ही कलावंतांना शूटिंगसाठी कोणी प्रवेश दिला आणि कसा दिला, लाल महालाबाहेर महापालिका सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले का नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या व्हिडिओ प्रकरणी पुणे पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल घेत महालाच्या सुरक्षा रक्षाला निलंबित करण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकाला विचारले असता त्याने एका वरिष्ठ नेत्याची परवानगी होती महणून आत सोडल्याचं म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT