Sambhaji Brigade | pruthviraj Chavhan  Sarkarnama
पुणे

Sambhaji Brigade Silver Jubilee: "आरक्षणावरच अवलंबून न राहता, मराठा समाजातील मुलांनी इतर मार्ग शोधावेत!"

Sambhaji Brigade : मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण..

सरकारनामा ब्यूरो

Pruthviraj Chavhan : संभाजी ब्रिगेड या संघटनेचे अधिवेशन पुणे शहरात पार पडले. गणेश कला क्रिडा मंच इथे हे अधिवेशन होत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अधिवेशनाचा समारोप करण्यात येणार आहे.

उद्घाटन समारंभावेळी खासदार श्रीनिवास पाटील, इंदूरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, युवराज संभाजीराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार, तसेच अभिनेते अशोक समर्थ व लेखक अरविंद जगताप यांनाहीविशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र केवळ आरक्षणाची आस लावून न बसता, इतर अनेक मार्गांनी प्रयत्न करावेत. सर्वप्रथम आरक्षणाचा निर्णय मीचघेतला होता. त्यामुळे प्रत्येकाला आरक्षण मिळावंअसं मला वाटतं, असे चव्हाण म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘ न्यायाव्यवस्थेचा उपयोग राजकीय राजकीय हत्यार म्हणून होताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २९०० छापे टाकण्यात आले महाराष्ट्राला ‘रेड (छापा ) राज्य’ म्हंटलं जावं का ? अशी स्थिती आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेले वर्षभरापासून आतमध्ये आहेत. आता कायद्यांचा राजकीय हेतू बाबत काय बोलावं.? असे चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT