Pune News : राज्यभर संघटना बांधणीसाठी झटणाऱ्या संभाजीराजेंनी पुण्यातील रस्त्यांवरच्या खड्यांचा मुद्दा हाती घेऊन पुणेकरांची मने जिंकण्याचा प्रयत्न चालविला आहे. पुण्यात खड्डेच खड्डे पडले आहेत. महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते आहे. ठेकदारांना पाठीशी घालत असल्याकडे संभाजीराजेंचे कार्यकर्ते लक्ष वेधले. महापालिकेकडे मागणी, प्रशासनाला सल्ला देण्यापलीकडे या कार्यकर्त्यांनी आता थेट रस्त्यावर खड्डे बुजवा - जीव वाचवा ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतून संभाजीराजेंच्या संघटनेला पुणे महापालिकेच्या निवडणुकीत फायदा होण्याची आशा आहे. त्याच हेतुने सभाजीराजेंच्या संघटनेने महापालिकेत लक्ष घातल्याचे दिसून येत आहे
पुणे महानगरपालिकेने शहरातील खड्डे बुजवण्याचा केला होता. पण शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. पण पुणे महापालिका प्रशासनाचे खड्ड्यांकडे लक्ष नसल्याचा आरोप स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव यांनी केला आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या सूचनेनुसार स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यभरात १०० पेक्षा जास्त ठिकाणी खड्डे बुजवा-जीव वाचवा हे आंदोलन करण्यात आले. पुण्यात RTO चौक व अलका चौका आंदोलन करून संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच, सत्तासंघर्षात मश्गुल असलेले राज्यकर्ते या गंभीर मुद्ंद्याकडे लक्ष देणार का ? असा सवालही स्वराज्य'चे जाधव यांनी उपस्थित केला आहे.
RTO चौकातून जुन्या बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झालेली आहे. या रस्त्यावर 'स्वराज्य'च्या वतीने खड्ड्यांना हार व फुले वाहण्यात आली, खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढून, साचलेल्या पाण्यात होड्या सोडण्यात आल्या, सोबतच खड्ड्यांचे आशीर्वाद घेऊन 'आमचे रक्षण कर' अशी उपहासात्मक विनंती करण्यात आली.'सगळे नेते एका पक्षात, रस्ते नाही कोणाच्या लक्षात', खड्डे बुजवा-जीव वाचवा, स्वराज्य संघटनेचा विजय असो! अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.