Raju Shetti,Sandeep Jagtap
Raju Shetti,Sandeep Jagtap Sarkarnama
पुणे

Sandeep Jagtap: "पैशाचं सोंग करता येत नाही..., असं सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

सागर आव्हाड

Pune News, 25 June : शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा बारामती येथील राज्य कार्यकारनी समोर ठेवला. तर संघटनेच्या कामासाठी राज्यभर फिरण्याची आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी स्वत: हा राजीनामा देत असल्याचं जगताप यांनी सांगितलं.

आपण आपल्या पदाचा राजीनामा का देत आहे? हे सांगताना जगताप म्हणाले, "मी स्वत:च स्वत:कडे बघतो, मला जाणीव आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून कसं काम करायला पाहिजे, मात्र ते काम मी करु शकलो नाही. ते काम मी का करु शकलो नाही, याला अनेक कारणं आहेत. ती आता मी सांगत नाही.

मात्र, सगळी सोंग करता येतात पैशांचं सोंग करता येत नाही. साडेचार वर्ष प्रदेशाध्यक्ष असताना मला अनेक अडचणी असताना देखील मी अनैतिकतेचा, भ्रष्टाचारा पैसा घेतला नाही, म्हणून मी कमी काम करु शकलो नाही", अशा शब्दात त्यांनी आपली व्यथा सर्वांसमोर मांडली.

तसंच दुसरं कोणी माझ्या जागी काम करणार असेल तर मी सन्मानाने माझे पद द्यायल तयार आहे. शिवाय प्रदेशाध्यक्षपद सोडलं तरी मी आयुष्यभर राजू शेट्टी (Raju Shetti) साहेबांसोबत राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. तसंच कुंटूंब सांभाळून जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ मी संघटनेला देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यकारनी समोर बोलताना जगताप म्हणाले, "खूप जड अंतकरणाने राज्य कार्यकारणी समोर मी राजीनामा ठेवला. राज्यभर व जिल्ह्यात देखील फिरण्यासाठी प्रचंड पैसे लागतात. वडिलांचे वय 72 झाले आहे, तर आई आजारी आहे. मुलाचे शिक्षण सुरू आहे. शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. कित्येक वर्षापासून नवीन पुस्तक आलं नाही. लेखन बंद झालं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हा निर्णय घेतला.

आयुष्यभर राजू शेट्टी साहेबांसोबत

कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राजू शेट्टी साहेबांसोबत काम करत राहणार. पुढील काही दिवसात राजू शेट्टीसाहेब व स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणी माझ्या राजीनाम्याचा स्वीकार करतील व नव्या चेहऱ्याला संधी देतील अशी मला अपेक्षा आहे. माझ्या कार्यकाळात माझ्याकडून कुठलीही अपेक्षा न करता नाशिक जिल्ह्यातील व राज्यातही आपण सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांनी माझ्यावरती लहान भावासारखे प्रेम केले. माझे मत व केलेली छोटी- मोठी आंदोलने आपण राज्यभर पोहोचवली." अशा शब्दात जगताप यांनी सगळ्यांचे आभार मानत आपली भूमिका स्पष्ट केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT