Sanjay Raut Sarkarnama
पुणे

Sanjay Raut : 'त्या' आमदारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव, राऊत स्पष्टच बोलले...

Sanjay Raut On Legislative Council Elections : विधानपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीने विजय मिळवला म्हणजे त्यांनी महाराष्ट्र जिंकला नाही, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आणि महायुतीला डिवचलं आहे.

Jagdish Patil

Pune News, 13 July : विधानपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीने विजय मिळवला म्हणजे त्यांनी महाराष्ट्र जिंकला नाही, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि महायुतीला डिवचलं आहे. शिवाय या निवडणुकीत आमदारांना 20-25 कोटी रुपये दिल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

तसंच आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही ही निवडणूक हरल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, "कालच्या निवडणुकीत छोट्या पक्षाच्या आमदारांना 20-25 कोटींचा भाव होता. तर काही जणांना दोन एकर जमीन दिली. महाविकास आघाडीकडे पुरेशी संख्या आणि पैसे नसल्यामुळे आम्ही हरलो."

गद्दारांनी गद्दारांना निवडून आणणारी निवडणूक

तर विधान परिषदेची निवडणूक ही गद्दारांनी गद्दारांना निवडून आणणारी निवडणूक होती. काँग्रेसची 7 मते फुटली यात कोणतेही आश्चर्य नाही. ती यापूर्वीच फुटली होती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्येही चंद्रकांत हंडोरे यांचाही या गद्दारांनी पराभव केल्याचंही ते यावेळी म्हणाले.

ते म्हणाले, शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीची 12 मते शेकापचे जयंत पाटील यांना मिळाली. पाटील हे आघाडीचे प्रमुख घटक आहेत. आम्ही थोडे जास्तीचे प्रयत्न केले असते तर गणित व्यवस्थित बसले असते, असा दावा राऊतांनी केला.

आघाडी एकत्र कोणतीही फूट नाही

तसंच आघाडीत कोणतीही फूट पडलेली नाही. मात्र, छोट्या पक्षाच्या आमदारांनी घात केल्याचंही राऊतांनी म्हटलं. यावेळी शिवसेनेकडे 15 मते असतानाही काँग्रेसच्या (Congress) मतांद्वारे आम्ही मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणलं. त्यामुळे आघाडीत एकी आहे मात्र, समाजवादी पक्ष, एमआयएम अशा छोट्या पक्षांची मते आम्हाला मिळाली नाहीत.

या आमदारांचा भाव शेअर बाजाराप्रमाणे त्यांचे भाव वाढत होता. तर काहींना आमदारांना दोन एकर जमीन दिल्याचा मोठा दावा राऊत यांनी केला. शिवाय भाजपने पैसे देऊन ही निवडणूक जिंकली. जनतेने त्यांना लोकसभेला धूळ चारली आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभेच्या निकालाबाबत बोलावं. विधानपरिषद निवडणुकीत त्यांचे सदस्य असल्यामुळे त्यांचा विजय झाल्याचंही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT