Saamana
Saamana  Sarkarnama
पुणे

`संजय राऊतांची थर्ड क्लास भाषा.... तळ गाठला!`

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवसेना (Shivsena) आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील वादाने नवा बिंदू गाठला आहे. पुणे महापालिकेत शिवसेनेचे खासदार आणि `सामना` या सेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांच्याविषयीच ते तक्रार करणार होते. ते काल पुणे महापालिकेत (PMC) येताच तेथे काल शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात निदर्शने केली. पुणे पालिकेच्या पायऱ्यांवर त्यांना तोल जाऊन पडला. त्यावरून आता भाजप आणि शिवसेना यांच्याविरोधात शाब्दिक युद्ध पेटले आहे.

या साऱ्या प्रकाराचे वर्णन `सामना` या वर्तमानपत्राने फार वेगळ्या पद्धतीने केली आहे. किरीट सोमय्या यांच्या शारीरिक व्यंगाची खिल्ली करत त्यांचे नाव प्रसिद्ध केले आहे. या सगळ्या घडामोडींची वर्णन करताना `किलीट तोमय्यांना शिवसैनिकांनी पायरी दाखवली`, या शीर्षकाने बातमी प्रसिद्ध केली आहे. यावरून सोशल मिडियात नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. `वृत्तपत्रात एवढी 'थर्ड क्लास' भाषा कधीच पाहिली नव्हती. तळ गाठला संजय राऊतांनी`, अशी नापसंती सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केली. त्यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये अनेकांनी त्यांच्या मताशी सहमती व्यक्त केली आहे. अत्यंत चुकीची भाषा आणि वृत्तपत्र विद्येचा हा अपमान आहे, असे मत वकिल असीम सरोदे यांनी मांडले आहे.

काहींनी संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याविषयी अशीच खालची भाषा वापरल्याचे स्मरण करून दिले आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनीही यापेक्षा भयंकर भाषा सामनाने यापूर्वी वापरली आहे. यालाच म्हणतात ठाकरी भाषा! पण कसं बोलणार? आता ते सेक्युलर झालेत!, असे मत नोंदविले आहे. तेवढंच नाही . ९२-९३च्या दंगलीच्या वेळची भाषा पहा. थेट चिथावणी. पण कारवाई झाली नाही. त्यातूनच हे चेकाळले, असेही वागळे यांनी म्हटले आहे.

तृप्ती डिग्गीकर यांच्या मतानुसार `सामना`ने हिंसेचे हे समर्थन केले आहे. शिवसैनिकांनी पायरी दाखवली आहे हे पक्षाच्या मुखपत्रातून प्रकाशित होते म्हणजे त्यांनी हे कर्तृत्व मानले आहे. या हिंसेसाठी संरक्षण कुठे मागणार?

या विषयाचे वर्णन करताना `सामना` ने शहरप्रमुख संजय मोरे मत प्रसिद्ध केले आहे. भाजपच्या घरामध्ये म्हणजेच पुणे महापालिकेत होत असलेला भ्रष्टाचार सोमय्या यांच्या निदर्शनास आणून द्यायचा होता. याबाबत शिवसैनिक त्यांना शांततेत निवेदन देणार होते. मात्र, त्यांनी निवेदन स्वीकारले नाही. त्यांच्याबरोबर असलेले भाजपचे पदाधिकारी आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. यात महिला आघाडीच्या कार्यकर्त्या जखमी झाल्या आहेत. यासंदर्भात शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत. गर्दीत सोमय्या यांना केंद्रीय राखीव पोलिसांनी मागे खेचले. यावेळी सोमय्या यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्यांना शिवसैनिकांनी कुठलीही धक्काबुक्की केली नाही, असा मोरे यांनी यात दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT