पुणे

Cricketnama : पोलिस प्रशासनाचा मोठा विजय; तेगबिरसिंग संधुंचे दमदार अर्धशतक

Sarkarnama | Cricketnama | पुण्यात सुरु आहेत सरकारनामाच्या मैदानावर राजकीय क्रिकेट सामने

सरकारनामा ब्युरो

पोलिस प्रशासनाने ३२ धावांनी जिंकला सामना. महसूल प्रशासन : ३६-५  पोलिस प्रशासन : ६८ - २

महसूल प्रशासनाचा पराभव. 

महसूल विभागाच्या आणखी दोन विकेट्स.

महसूल विभागाची पडझड. लागोपाठ दोन विकेट. 

चौथ्या ओव्हरमध्ये फटकेबाजी. एक चौकार आणि २ दुहेरी धावा. 

तिसऱ्या ओव्हरमध्ये केवळ ३ धावा. 

प्रशांत शेटे यांची विकेट. ७ धावांवर बाद. संदिप गायकवाड मैदानात. 

दुसऱ्या ओव्हरनंतरही महसूलची संथधावगती. १५-०

महसूलची सावध सुरुवात. पहिल्या ओव्हरनंतर ९ रन्स आणि ० विकेट्स. 

नील प्रसाद चव्हाण, प्रशांत शेटे, संदिप गायकवाड, संदेश शिर्के, शिवाजी शिंदे, सुनिल शेळके यांच्यासह महसूलची टीम बॅटिंगला सज्ज. 

महसूल प्रशासनापुढे ६९ धावांचा डोंगर. 

पोलिस प्रशासनाने उभारला धावांचा डोंगर. तरुण तुर्क अधिकारी तेगबीर यांची फटकेबाजी. २२ चेंडूत फटकावल्या ५४ धावा. तर राहूल श्रीरामे यांनी १२ चेंडूमध्ये ११ धावा. 

तेजिंदरसिंग संधू, राहूल श्रीरामे, भाऊसाहेब ढोले, उल्हास कदम, अनिकेत पोटे, तुषार रावडे यांच्यासारखे तगडे खेळाडू मैदानात. 

पोलिस प्रशासनाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. ३ आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलिसांची तगडी टीम मैदानात. 

मॅच क्रमांक ३ - महसूल विरुद्ध पोलिस प्रशासन. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा ३३ धावांनी विजय. अनिकेत तटकरेंची निर्णायक खेळी. २१ बॉल्समध्ये फटकावल्या २४ धावा.

राजकीय मैदानात चचपडणारी काँग्रेस क्रिकेटच्या मैदानातही चचपडताना दिसून येत आहे. काँग्रेस पराभवाच्या छायेत. ६ बॉलमध्ये ३७ रन्सची गरज. काँग्रेसचा स्कोर २९ धावांमध्ये ३ विकेट्स. 

काँग्रेसचीही अडखळती सुरुवात. पुरंदरचे धुरंदर आमदार संजय जगताप ३ धावा करुन बाद. धनंजय मुंडेंनी काढली विकेट. 

राष्ट्रवादीकडून काँग्रेसला ६१ धावांचे आव्हान. राष्ट्रवादीचा स्कोर ६ ओव्हरमध्ये ६० धावा. ४ विकेट्स. 

राष्ट्रावादी काँग्रेसची अडखळती सुरुवात. सुदर्शन पवार, धनंजय मुंडे, सुदर्शन पवार धावबाद. राष्ट्रवादीच्या ४६ धावांत ३ विकेट्स. अनिकेत तटकरे मैदानात पाय रोवून उभे. अनिकेत तटकरेंची २१ चेंडूत २४ धावांची फटकेबाजी. 

काँग्रेस - विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पुढील सामाना सुरु. नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय. 

शिवसेनेने ९ विकेट्सने जिंकला पहिला सामना. शिवसेनेवर भाजप भारी. शिवसेनेच्या खेळाडूंचा नार्वेकरांना उचलून घेत जल्लोष. खासदार धैर्यशिल माने ठरले शिवसेनेच्या विजयाचे शिल्पकार.  

आमदार राम सातपुतेंनी काढली खासदार धैर्यशिल माने यांची विकेट. ८ चेंडूमध्ये १७ धावा. 

धैर्यशिल मानेंची तुफान फटकेबाजी. ५ बॉलमध्ये फटकावल्या १३ धावा. 

शिवसेनेकडून खासदार धैर्यशिल माने मैदानात. 

भाजपने शिवसेनेला दिले ३५ धावांचे आव्हान. राम सातपुते यांनी केल्या २२ चेंडूमध्ये २५ धावा. महापौर मोहोळ शुन्यावर बाद 

फडणवीसांच्या टीममधील विश्वासु खेळाडू राम सातपुते देत आहेत शिवसेनेला टक्कर 

पुण्यात विनायक निम्हण- सनी निम्हण यांच्यात फूट. वडिल सेनेत तर मुलगा भाजपात. 

महापालिकेपासून राजकारणाची सुरुवात करुन दिल्ली गाठण्याचा इरादा करणाऱ्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांनी पुण्याच्या मैदानावर रोखले. शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर त्यांनी मोहोळ यांची विकेट घेतली. 

सुजय विखे पाटील आणि माझे बोलणे झाले आहे, ते भविष्यात धनुष्यबाण हाती घेतील. - मिलिंद नार्वेकर 

इथे सर्वांचे जर्सीमधील फोटो काढून ठेवा. कारण हे पुढे कायमस्वरुपी याच संघात राहतील का याची काळजी सरकानामाने घ्यायची आहे. - खासदार सुजय विखे पाटील 

सरकारनामा सर्वांना एकत्र आणत आहे, पण ते उद्या असं पण सांगतील की एकत्र येवून सरकार बनवा पण मुख्यमंत्रीपद पहिल्यांदा आम्हालाच लागेल. - मिलिंद नार्वेकर

आरोप-प्रत्यारोप, एकमेकांच्या उकाळ्या-पाकळ्या काढून गढूळ झालेले महाराष्ट्रातील राजकारण शांत करण्यासाठी सरकारनामाची ही स्पर्धा मदत करेल - धनंजय मुंडे (सामाजिक न्यायमंत्री) 

महाराष्ट्राच्या राजकारणात बळ कमी झालेली काँग्रेस सरकारनामाच्या मैदानात मात्र मोठ्या ताकदीने उतरलेली पाहायला मिळाली. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी मोठ्या ताकदीने आपली टीम गोळा केली आहे.  

राष्ट्रवादीकडून ओपनिंगला उतरलेल्या आमदार अनिकेत तटकरे यांची विकेट घेतली. त्यानंतर सुदर्शन पवार आणि किशोर कांबळे यांनी संघाचा धावफलक हलता ठेवला. 

सचिन अहिर यांनी देखील मिलींद नार्वेकर यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पुढे ते आऊट झाल्यानंतर त्यांच्या जागी खासदार धैर्यशिल माने यांनी मैदानात उतरत संघाची धावसंख्या पुढे नेली. शिवसेनेने ३९ धावा करत राष्ट्रवादीपुढे ४० धावांचे आव्हान ठेवले.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जसे जोरदार बॅटिंग करतात तशी बॅटिंग पुण्यात शिवसेना करेल असे सांगुन मिलींद नार्वेकर यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गंमत म्हणजे विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेल्या सचिन अहिरांना त्यांनी ओपनिंग करण्याची संधी दिली आणि ते शिवसेनेसाठी काय करु शकतात याची परिक्षा घेतली.

पुण्यात सरकारनामा आयोजित क्रिकेटनामाच्या रणसंग्रामात उतरताच मुख्यमंत्र्यांचे सर्वेसर्वा आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी धुमाकूळ घातला. त्यांनी सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसनेचे दोन तगडे उमेदवार शिवसेनेच्या गोटात ओढून घेतले आणि राष्ट्रवादीला आपण कधीही आपलेसे करु शकतो असा मेसेज त्यांनी क्रिकेटच्या मैदानावर दिला.

पुणे : एरव्ही राजकीय मैदानात जोरदार गोलंदाजी फलंदाची करणारे राजकीय नेत्यांची क्रिकेटच्या मैदानातली कामगिरी थोड्याच वेळात आपणाला पहायला मिळणार आहे..सामने सुरु होताच खालील लिंकवर आपल्याला हा थरार अनुभवाला मिळेल....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT