PCMC
PCMC Sarkarnama
पुणे

Sarkarnama Impact : `पीसीएमसी`तील मलईदार प्रस्ताव स्थगित

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : लाचलुचपतची (ACB) कारवाई होऊनही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) स्थायी समितीत दोन मलईदार प्रस्ताव अशा मथळ्याखाली (PCMC Standing Committee) 'सरकारनामाने' आज वृत्त प्रसिद्ध केले. त्याची तातडीने दखल घेत, यातील एक प्रस्ताव स्थायी समितीच्या आजच्या (ता.२९ सप्टेंबर) साप्ताहिक बैठकीत तहकूब करण्यात आला. दुसरा मंजूर झाला असला, तरी प्रशासनाकडून तो रोखला जाण्याची शक्यता आहे.

स्थायीतील लाचखोरी तथा टक्केवारीनंतरही अगोदर स्थगित झालेले हे दोन विषय आजच्या स्थायीच्या विषयपत्रिकेवर पुन्हा मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. 'असे विषय पाठवू नका, असे सर्वच खात्यांना सांगितले आहे', असे स्थायीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी बैठकीनंतर 'सरकारनामाला' सांगितले. दरम्यान, सरकारनामाने त्याबाबत वृत्त दिल्याने या दोन्ही प्रस्तावांवर बैठकीत आवर्जून चर्चा झाली. त्यातील पालिका शाळांतील शिक्षकांना ऑनलाईनच्या तंत्राचे प्रशिक्षण देणारा विषय मंजूर करण्यात आला. खरेतर तो अगोदरच मंजूर व्हायला हवा, असे सांगत त्याची कोरोनाकाळात तातडीची गरज होती, असे लांडगे यांनी सूचित केले.

दरम्यान, कोरोनाची लाट ओसरत चालली असून आता आठवड्याभरातच प्रत्यक्ष शाळा सुरु होणार असल्याने प्रशासन स्थायीने हा मंजूर केलेला विषय मान्य करण्याची शक्यता नसल्याचे स्थायीतीलच जबाबदार सूत्रांनी सांगतिले. तर, पालिका शाळांचा दर्जा खासगी शाळांसारखा करून तेथील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आणि तेथील मुलांचे हस्ताक्षर सुंदर करण्याकरिता मुलांना `सुंदर माझे अक्षर` हे पुस्तक देण्याचा अजब प्रस्ताव, मात्र, तहकूब करण्यात आला. पुस्तक देऊन अक्षर कसे वळणदार करणार किंवा होणार असा प्रश्न सरकारनामाच्या बातमीत उपस्थित करण्यात आला होता. त्याची दखल घेण्यात येऊन निविदा न काढता थेट पद्धतीने ही पुस्तके खरेदीचा विषयही स्थगित ठेवण्यात आला. त्यावर आठ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च होणार होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT