Satara Doctor Case  sarkarnama
पुणे

Satara Doctor Death Case : महिला डाॅक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आरोप असलेला खासदार भाजपचा? स्वत: केला मोठा खुलासा

Ranjitsinh Nimbalkar doctor death case : महिला डाॅक्टरच्या आत्महत्या प्रकरणात खासदाराने फोन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे फोन करणारा भाजपचा माजी खासदार असल्याची चर्चा सुरू आहेत. त्यावर माजी खासदारने आरोपांना उत्तर दिले आहे.

Roshan More

Ranjitsinh Nimbalkar News : फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात डाॅक्टर असलेल्या महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर तिच्या नातेवाईकांनी खासदाराचे दोन पीए फोन करून तिच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे तो खासदार कोण याची चर्चा सुरू झाली होती. या प्रकरणी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या भावावर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आरोप केले जात आहे. त्यावर त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, 'ही घटना निंदनीय आहे. आत्महत्येचे गलिच्छ राजकारण केलं जात आहे. डाॅक्टर महिलेचा जीव गेला. त्या महिलेने का जीव दिला, याचं संशोधन होणं गरजेचं आहे. जसं महाराष्ट्रात काही झालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला जातो तसं इथे काही झालं तर आमच्या नावाची बदमानी करायची अशी परंपराच घडली आहे. पण याला फलटणकर भीक घालत नाही.'

'जे विरोध असतात ते नेहमीच आरोप करत असता की दबाव आहे. पण उलट आम्हीच मागणी करतोय की याची तपासणी करावी. सीडीआर खोटं बोलत नाही, सीडीआर असेल व्हाॅट्सअप मेसेज, चॅट असेल त्यातून सत्य बाहेर येईल. त्या भगिनीचा जीव गेला, यामध्ये कोणाला राजकारण करायचं आहे हे तालुक्यातला कळून आलं आहे. मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार काही जण करत आहेत.', असे देखील ते म्हणाले.

प्रशांत बनकरला अटक

महिला डाॅक्टरने आत्महत्येपूर्वी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आऱोप केले आहेत. बदने याने आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचे महिला डाॅक्टरच्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. तर, प्रशांत बनकर याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे नमूद केले आहे. या दोघांवर देखील गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा पासून दोघेही फरार होते. दरम्यान, पोलिसांनी प्रशांत बनकर याला पुण्यातून अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT