Satej Patil angry statement to party workers sarkarnama
पुणे

Satej Patil Anger : सतेज पाटील संतापले, 'हे काय माझ्या घरचं लग्न नाही...', 'त्या' नाराजांची खरडपट्टी

Congress leader Satej Patil strong statement: पुण्यामध्ये कितीही काँग्रेसचे गट असले तरी या कार्यक्रमाच्या निमंत्रण सगळ्यांना देण्यात आले आहे, असे सांगत सतेज पाटलांनी नाराजांची खरडपट्टी काढली.

Sudesh Mitkar

Pune News: पुण्यामध्ये काँग्रेसचा नव्याने शहराध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसच्या हायकमांडने यासाठी प्रभारी म्हणून हिमाचलचे आमदार विनोद सुलतानपूरी यांची नेमणूक केली आहे. ते पुढील तीन दिवस पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे पुण्याचे प्रभारी सतेज पाटील हे देखील असणार आहेत.

आज पासून या चर्चेला सुरुवात झाली असून पुण्यातील काँग्रेस मधील विविध गटांशी सुलतानपुरी चर्चा करणार आहेत. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काँग्रेस मधील काही गट नाराज असल्याचे बोले जात आहे. या कार्यक्रमाचे आपल्याला निमंत्रण देण्यात नसल्याबाबतच्या तक्रारी या गटांनी केले आहेत.

काही विशिष्ट लोकांनाच प्रभारी यांच्यासमोर आपली मत मांडण्याची संधी देऊन आपल्या मर्जीतील शहराध्यक्ष करण्याचा करण्याचा डाव आखला जात असल्याच्या देखील चर्चा सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहेत. याबाबत सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

पुण्यामध्ये कितीही काँग्रेसचे गट असले तरी या कार्यक्रमाच्या निमंत्रण सगळ्यांना देण्यात आले आहे. त्या संदर्भातली प्रेस रिलीज देखील काढण्यात आली होती. मात्र अशा कार्यक्रमासाठी निरोपांची गरज लागत नाही. ज्यांचं पक्षावर प्रेम आहे. ते कार्यक्रमाला कोणत्याही निमंत्रणाशिवाय येतील. आणि हे काय माझ्या घरचे लग्न नाही त्यामुळे मी निमंत्रण द्यायला, असे देखील ते म्हणाले.

सगळ्या काँग्रेसच्या लोकांना आजच्या बैठकीला यावच लागेल आणि आपलं मत मांडावा लागेल. यासाठी कोणालाही वेगळं असं निमंत्रण देऊन बोलवण्याची गरज नाही, आशा भूमिका सतेज पाटील यांनी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT