Savitribai Phule University
Savitribai Phule University  sarkarnama
पुणे

Savitribai Phule Pune University : पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसाठी आज मतदान

सरकारनामा ब्युरो

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर गटासाठी आज (रविवारी) मतदान होत आहे. पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील तब्बल एक लाख २० हजार पदवीधर मतदान करणार आहेत. सकाळी दहा वाजता मतदानास सुरवात होणार आहे.

तीनही जिल्ह्यात ७१ मतदान केंद्र केले आहे. शक्यतो आपण ज्या ठिकाणी मतदारयादीसाठी अर्ज केला असेल, तिथेच आपले मतदान असण्याची जास्त शक्यता आहे. संकेतस्थळावर अधिकृत मतदान केंद्र दिले आहे. तिथे आपला मतदाता क्रमांक आणि केंद्र मतदाराला मिळेल.

मतदान कोण करणार?

विद्यापीठाकडे अधिकृत पदवीधर नोंदणी केलेले आणि विद्यापीठाने घोषित केलेल्या मतदार यादीतील व्यक्ती अधिसभेसाठी मतदान करू शकते. यासंबंधीची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

असे करा मतदान

  • मतदानाला जाताना सोबत ओळखपत्र ठेवावे. (उदा. आधारकार्ड)

  • मतदान प्राधान्य क्रमाने करावयाचे असल्याने. मतपत्रिकेवर आपल्या पसंतीप्रमाणे उमेदवारांना इंग्रजी किंवा मराठीत क्रमांक द्यावे. रोमन अंक किंवा वर्तुळ आदी खुणा करू नये

  • खुल्या प्रवर्गासाठी एक मतपत्रिका व आरक्षित प्रवर्गासाठी पाच मतपत्रिका मिळतील

  • निवडणूक यंत्रणेने उपलब्ध केलेल्या पेनद्वारेच पसंती क्रमांक लिहावा

  • मतदारांनी मोबाईल किंवा इतर संयंत्रे केंद्रावर नेण्यास बंदी आहे

  • अधिकृत संकेतस्थळ ः https://election.unipune.ac.in/

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT