NCP MLA Shankar Mandekar’s brother Balasaheb Mandekar arrested Sarkarnama
पुणे

Shankar Mandekar: राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या भावाच्या गोळीबार प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Police Action Shankar Mandekar Brother Gun License Cancelled: शस्त्र परवाना हा वैयक्तिक संरक्षणासाठी असतो; मात्र त्याचा वापर धमकी देणे, दहशत निर्माण करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी गोळीबारासाठी होणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात अशा गैरवापराचे ठोस पुरावे मिळाल्याने कारवाई करण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर यांच्या नावावर नोंदवलेल्या गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. यात दोन परवानाधारक पिस्तुलांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. शस्त्राचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

घटना २१ जुलै २०२५ च्या रात्री अंबिका कला केंद्र, चौफुला (यवत परिसर) येथे घडली. बाळासाहेब मांडेकर यांनी गणपत जगताप यांच्या नावावर असलेल्या परवानाधारक पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. यामुळे परिसरात दहशत पसरली आणि यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा वादंग उफाळून आला होता.

तपासात पोलिसांनी साक्षीदारांचे जाब, घटनास्थळावरील पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शस्त्राचा चुकीच्या हेतूने वापर झाल्याचे निष्कर्ष काढले. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी गणपत जगताप यांचा आर्म लायस्न्स रद्द करण्याचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड आयुक्तांकडे पाठवला. प्रस्तावाच्या तपशीलवार छाननीनंतर दोन्ही पिस्तुलांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

शस्त्र परवाना हा वैयक्तिक संरक्षणासाठी असतो; मात्र त्याचा वापर धमकी देणे, दहशत निर्माण करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी गोळीबारासाठी होणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात अशा गैरवापराचे ठोस पुरावे मिळाल्याने कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील सर्व संबंधितांची चौकशी सुरू ठेवली आहे. वाढत्या गोळीबार आणि टोळीयुद्धाच्या घटनांमुळे पोलिस शस्त्र परवान्यांच्या वापराबाबत अधिक कडक धोरण अवलंबण्याच्या तयारीत आहेत. यामुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT