Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्र पक्षांमध्ये मतमतंत्र पाहायला मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गट हा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशा भूमिकेत आहे.
तर त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विरोध करण्यात आला आहे. यामुळे कुठेतरी शिवसेना ठाकरे गटाची कोंडी झाली असल्याचं बोललं जात आहे. यावरून आता शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
पुणे दौऱ्यावरती असताना उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी मीडियाशी शनिवारी (ता.21) संवाद साधला. यावेळी त्यांनी धारावीतील घडलेल्या घटनेबाबत वक्तव्य केलं. सामंत म्हणाले, गैरसमजातून कोणतीही घटना होऊ नये. ज्यांचा गैरसमज झाला असेल त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं आवश्यक आहे.
अनधिकृत बांधकामामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे चर्चेतून मार्ग काढणे आवश्यक आहे. मी पुण्यातील असल्यामुळे मला अधिक माहिती नाही. ज्याचा गैरसमज झालाय त्यांनी महानगरपालिकेशी संपर्क करण गरजेचं आहे असंही सामंत यांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, मी काल देखील मनोज जरांगे यांच्याशी बोललो आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार पूर्वीपासूनच सकारात्मक असून शिंदे समिती स्थापन केली आहे. तसेच निजाम कालीन नोंदी बाबत देखील सरकार सकारात्मक आहे आणि नोंदी असणाऱ्या कुणबी बांधवांना दाखले देण्याचे काम देखील सरकारने केले आहे.
सगेसोयरेबाबतचा निर्णय निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून देखील सरकार सकारात्मक आहे. तसेच सरकारने मराठा समाजाला टिकणारे 10% आरक्षण देखील दिले आहे.हे सगळं करत असताना obc च्या न्याय हक्काला कुठेही धक्का लागणार याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांना माझी आता देखील विनंती आहे. सरकार सकारात्मक उपाय काढणार त्यांनी उपोषण मागे घ्यावे असंही सामंत यांनी यावेळी सांगितले.
पुणे दौऱ्यावरती असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून गद्दार यांचा चेहरा पुढे ठेवणार का? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.
त्याबाबत प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले, 15 दिवसांपूर्वी शरद पवारसाहेबांनी जी भूमिका मांडली त्याचा बोध काही लोकांनी घेणे आवश्यक आहे. एका दगडात 3 पक्षी कसे मारतात हे 15 दिवसांपूर्वी सिद्ध झाले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी इतरांवरती टीका करण्यापेक्षा पवारसाहेब काय म्हणाले, याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे असा टोला उदय सामंत यांनी लगावला.
निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदावर चर्चा करण अयोग्य आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यातून ज्यांचं मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न आहे ते धुळीला मिळाला आहे. तसेच शरद पवार यांनी संख्याबळ आल्यास नवीन चेहऱ्याचा देखील विचार होऊ शकतो असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळ शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांनी संख्याबळ असल्याशिवाय मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पाहू नये, असा टोला उदय संपत्ती यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.