महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलं आहे. यातच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मराठ्यांनी आरक्षण का मागावे? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला होता. याबद्दल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब यांना प्रश्न विचारताच ते चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळाले.
संभाजी भिडे काय म्हणाले होते?
"मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. पण, मराठे म्हणजे वाघ आणि सिंह आहेत. संपूर्ण जंगल तुमचे आहे. मग मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा असतो. आरक्षण कुठे घेऊन बसलाय..." असा सल्ला संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) यांनी दिला होता.
शरद पवारसाहेबांनी काय म्हटलं?
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर पुण्यात प्रसारमाध्यमांच्या शरद पवार ( Sharad Pawar ) यांना प्रश्न विचारल्यावर ते संतापल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार म्हणाले, "संभाजी भिडे, हे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का? काहीही प्रश्न विचारता...."
मनोज जरांगे-पाटलांचा भिडेंवर निशाणा...
मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी संभाजी भिडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. "संभाजी भिडे बोलत असलेले शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. याला-त्याला दोष देऊन उपयोग नाही. जंगल आमचं आहे ना, मग वाघ आरक्षणाची शिकार करणार... कशाला लागतंय आरक्षण, हे ज्या-ज्या संघटनेत पक्षात मराठ्यांची पोरं आहेत, त्यांना माहिती आहे. कारण, त्या पक्षाचा किंवा संघटनेचा झेंडा उचलून तो आपल्या लेकरांचं बहीण-भावाचं कल्याण करू शकत नाही. त्यांना आरक्षण लागणार आहे," अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.