Sharad Pawar Group Pune News :
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष असलेले प्रशांत जगताप यांना धमकीचा मेसेज आला आहे. अलीकडच्या काळात करण्यात आलेल्या त्यांच्या राजकीय वक्तव्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे. प्रशांत जगताप यांनी पोलिसांमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पुणे शहरातील बहुतांश कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहिले. शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी होणे पसंत केले, पण तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगताप यांनी Sharad Pawar गटाबरोबर राहणे पसंत केले.
दरम्यानच्या काळामध्ये प्रशांत जगताप यांनी राज्य आणि केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने केली आहेत. तसेच पुणे शहरातून त्यांनी अनेकदा अजित पवार यांच्या वक्तव्यांवर आणि कार्यशैलीवर आक्षेप नोंदवला आहे.
काही दिवसांपूर्वी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार यांना बहाल केल्यानंतर राष्ट्रवादी पुणे शहर कार्यालयाचा वाद उफाळून आला. शहर कार्यालय आपल्याला मिळावे यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटांतील शहराध्यक्ष ऑफिसच्या वादावरून भिडल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्या नावाच्या कोणशिलेची तोडफोडदेखील करण्यात आली होती. यामुळे दोन्ही गटांत तणावाचे वातावरण असल्याचे चित्र काही दिवसांपासून शहरात पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांना गेल्या चार दिवसांपासून एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून धमकीचे मेसेज येत आहेत. 'राजकीय भाष्य करू नये, अन्यथा बघून घेऊ..!' असा इशारा या मेसेजमधून दिला जात आहे. हा प्रकार वाढतच असल्याने जगताप यांनी सायबर पोलिसात धाव घेतली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काय आहे तक्रार?
मी प्रशांत सुदाम जगताप माजी महापौर पुणे तथा सध्या पुणे शहर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार या पक्षाचा शहराध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. सध्या निवडणुकीचा काळ आहे. अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्षाबरोबर आमचा संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये काही समाजकंटक सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे मला धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागच्या चार दिवसांपासून मला 9987924729 या फोन नंबरवरून टेक्स्ट मेसेजद्वारे व व्हाॅट्सअप मेसेजद्वारे मी सध्या जे राजकीय भाष्य करीत आहे ते थांबवावे, अन्यथा बघून घेऊ, अशा प्रकारची धमकी दिली जात आहे. या नंबरवरून आज दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 04.30 वा मला शेवटचा मेसेज आलेला आहे.
यासंदर्भामध्ये मी आपणांस या नंबरद्वारे आलेले मेसेजेसचे स्क्रीन शॉट सोबत जोडत आहे. तरी आपण वरील गोष्टीची गांभीर्यपूर्वक नोंद घेऊन संबंधित व्यक्ती लवकरात लवकर शोधून काढून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी माझी आपणांस नम्र विनंती.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.