Vilas Lande News :  Sarkarnama
पुणे

Vilas Lande News : माजी आमदार विलास लांडेंना गळाला लावण्याचे शरद पवार गटाचे प्रयत्न, शहराध्यक्षपदाची दिली ऑफर !

Sharad Pawar News : पक्षातले एक मोठा मोहरा असलेले भोसरीचे पहिले आमदार विलास लांडे..

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडे अजित पवार यांच्याकडे गेलेले नेते व पदाधिकाऱ्यावंर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्याचवेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही माजी नगरसेवकांसह पक्षातले एक मोठा मोहरा असलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे - पाटील यांना गळाला लावण्याचे प्रयत्नही सुरु केले आहेत. (Vilas Lande News)

अजितदादांचे आवडते शहर असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये हातावर मोजता येतील इतके पदाधिकारी सोडता बहुतांश लोक हे बंड केलेल्या गटात सामील झाले आहेत. मात्र याला तीन पदाधिकारी अपवाद ठरले आहेत. इम्रान शेख हे शहरात,तर सुनील गव्हाणे आणि रविकांत वर्पे हे राज्य पदाधिकारी आहेत. गव्हाणे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, वर्पे हे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तर शेख हे युवक शहराध्यक्ष आहेत. (Latest Marathi News)

यामध्ये गव्हाणे व शहरातील इतर काही पदाधिकारी व शरद पवार समर्थक कार्यकर्त्यांनी नुकतीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन उद्योगनगरीतील पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास लांडेंना पक्षात घेण्याची मागणी केली.यावर साहबांशी (शरद पवार) बोलतो, असे आश्वासन मिळाल्याचे गव्हाणेंनी सरकारनामाला सांगितले.

विलास लांडे-पाटील यांना शहराध्यक्ष करा, अशी विनंतीही प्रदेशाध्यक्षांना केली असल्याची माहिती गव्हाणे दिली. मात्र, यासंदर्भात लांडे यांच्याशी बोलणे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासारख्या दमदार नेत्याची साथ मिळाली, तर पक्षाला मोठा फायदा होणार आहे. कारण त्यांनी खासदारकीही लढविलेली आहे, असेही ते म्हणाले. पिंपरी महापालिकेतील मागील टर्ममध्ये निवडून आलेले सर्वच्या सर्व माजी नगरसेवक अजित पवार गटात गेले आहेत. यामधील काहींना गळाला लावण्याचे प्रयत्न शरद पवार गटाने सुरु केल्याचे त्यांच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, याबाबत लांडे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. उद्योगनगरीतील राष्ट्रवादीच्या इम्रान शेख, सुनील गव्हाणे आणि रविकांत वर्पे या पदाधिकाऱ्यांनी खुले समर्थन शरद पवारांना दिले आहे. तर इतर सर्वांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला. मात्र लांडेंनी आपलं समर्थन कुणालीही अद्यापपर्यंत जाहीर केलेला नाही.आपली झाकली मूठ सव्वा लाखाची त्यांनी ठेवली आहे.

दोन जुलैला अजित पवारांनी मुंबईत बंड केले व शपथ घेतली त्यावेळी लांडे हे पुण्यात असलेल्या शरद पवारांना जाऊन भेटले. यानंतर शहरातील पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंना मंत्री करावे, या मागणीसाठी ते शहर पदाधिकाऱ्यांसह नुकतेच (ता.११) मुंबईत अजितदादांना भेटून आले. यातून ते नक्की कोणाकडे हे स्पष्ट झालेले नाही.

विलास लांडे यांची पत्नी मोहिनी या पक्षाच्या महापौर, तर चिरंजीव विक्रांत हे नगरसेवक राहिले आहेत. विक्रांत पुन्हा नगरसेवकपदाची निवडणूक लढविणार आहेत. हे समीकरण विचारात घेऊन लांडे काय निर्णय घेतात, याकडे आता भोसरीचेच नाही, तर पिंपरी-चिंचवडचेही लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT