Sharad Pawar sarkarnama
पुणे

Sharad Pawar Health update : शरद पवार यांची तब्येत बिघडली; रुबी हॉल रुग्णालयात घेणार उपचार

Sharad Pawar Health update : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणण्यात आले आहे. खोकल्याच्या त्रासामुळे त्यांची प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारांचा निर्णय घेतला जाईल.

Hrishikesh Nalagune

Sharad Pawar Health update : राज्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती आहे. रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाईल.

सोमवारी (9 फेब्रुवारी) सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिट केलं जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ."

जिल्ह्यात एका बाजूला जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. त्याचवेळी शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याची बातमी आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुण्याची जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढवली होती. दोघांनीही मिळून बहुमताचा आकडा गाठला आहे. 40 हुन अधिक जागांवर विजय मिळवला आहे.

पण या विजयावर अजित पवार यांच्या अकाली निधनाची खोल छाया आहे. बारामतीमध्ये मतमोजणी केंद्रातून विजयी उमेदवार बाहेर पडत असताना नेहमीचा उत्साह, गुलाल, फटाके किंवा घोषणाबाजी कुठेही दिसली नाही. उलट डोळ्यांत अश्रू, हातात हात, आणि मनात फक्त अजितदादांच्या अनुपस्थितीची पोकळी होती. “हा विजय आमचा नसून दादांचा आहे,” अशी भावना शामल वाबळे यांच्यासह अनेक विजयी उमेदवारांच्या शब्दांतून उमटत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT