Ajit Pawar, Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवार-अजित पवार आमनेसामने; डीपीसीच्या बैठकीत काय होणार?

Sharad Pawar Ajit Pawar Dpdc meeting : डीपीसीच्या बैठकी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत असताना शरद पवार यांना या बैठकीचे निमंत्रण आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार यादेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Roshan More

Sharad Pawar News : जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक पुण्यात आज (शनिवारी) होणार आहे. या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. जिल्हाचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. त्यामुळे शरद पवारांनी या बैठकीला उपस्थितीती लावली तर अजित पवार-शरद पवार आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांनी गेल्यावर्षी डीपीसीच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे ते आज देखील या बैठकीला हजेरी लावणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

डीपीसीच्या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक आराखडा निश्चित केला जाणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणत्या आमदाराला किती निधी देणार हे देखील निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्ताधारी आमदारांना निधीच्या बाबात झुकते माप मिळण्याची शक्यता आहे.

पवार कुटुंबातील चौघे बैठकीला?

डीपीसीच्या बैठकी पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या अध्यक्षतेखाली होत असताना शरद पवार यांना या बैठकीचे निमंत्रण आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार यादेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबातील चौघे जण डीपीसीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी शरद पवारांची हजेरी

गेल्यावर्षी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 19 मे 2023 मध्ये डीपीसीच्या बैठकीला शरद पवारांनी Sharad Pawar हजेरी लावली होती. विशेष म्हणजे बैठकीला ते वेळेआधीच पोहचले होते. बैठक संपेपर्यंत ते उपस्थित होते. मात्र, कोणत्याही विषयावर त्यांनी भाष्य केले नव्हते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT