Sharad Pawar, Devendra Fadnavis  sarkarmnama
पुणे

Pune Politics: अजितदादा कारभारी असलेल्या पुण्यात शरद पवारांनी घातलं लक्ष; CM फडणवीसांना पत्र पाठवत केली 'ही' मागणी

Sharad Pawar Letter To Devendra Fadnavis: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरकारभाराबाबत शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. बाजार समिती संचालक मंडळाच्या गैरकारभाराची सखोल चौकशी करण्याबात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरकारभाराबाबत शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लक्ष घातले आहे. बाजार समिती संचालक मंडळाच्या गैरकारभाराची सखोल चौकशी करण्याबात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.

यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी चौकशीची मागणी करूनही सरकारने दुर्लक्ष केले होते. आता शरद पवार मैदानात उतरल्याने सरकार संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबतच्या चौकशीला गती देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुणे बाजार समितीत संचालक मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमिततता व गैरकारभार झाल्याच्या तक्रारी आहेत. बाजार समितीच्या बाबतीतील तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेवून तातडीची कार्यवाही अपेक्षित असल्याचे पवार यांनी नमूद केले आहे. पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून अनेक कामांमध्ये अनियमितता झाली आहे.

याबाबतचा संदर्भ देखील पवार यांनी पत्रात दिला आहे. याबाबत पणनमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात पुणे बाजार समितीची (Pune Bazar Samiti) उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र समिती स्थापन झालीच नाही. त्यामुळे बाजार समितीच्या गैरकाभाराबाबत पाठीशी घातलं जात आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तर दुसरीकडे पणनसंचालकांनी 7 जुलै 2025 रोजी चौकशीचे आदेश दिले होते. यामध्ये जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांची प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. मात्र ते बाजार समितीच्या गैरकारभारास पाठबळ देत असल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे. त्यामुळे त्रयस्त वरिष्ठ अधिकार्‍याची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करावी याप्रमुख मागणीसह संचालकांवरही गंभीर आरोप केले आहेत.

संचालकाची गुंडगिरी आणि ताबेमारी

संचालकांच्या काळ्या धंद्यांच्या सरकारदरबारी तक्रारींमुळे बाजारातील एक व्यापारी संचालक अस्वस्थ झाला असून त्यांच्याशी सहमत नसलेल्या लोकांवर दहशत व गुंडगिरी करून त्यांची घौडदैड सुरू आहे. त्यांच्या गाळ्यांवरील व्यवहार संशयास्पद असून दप्तर तपासणी होणे आवश्यक आहे.

तर, दुसर्‍या एका व्यापारी संचालकाने बाजारातील चौकातील मोक्याच्या 56 मोकळ्या जागांवर ताबा मारत तेथे भाडेकरू ठेवून महिन्याला 70 ते 80 लाख रुपये गोळा करण्याचे काम आरंभिले आहे. याविरोधात आवाज उठवणार्‍यांना हे काम पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने सुरू असल्याचे धमकीवजा सांगितले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते लवांडे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT