Sharad Pawar
Sharad Pawar  Sarkarnama
पुणे

Sharad Pawar In MPSC Protest: शरद पवारांची मध्यस्थी यशस्वी? विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश,लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुण्यात एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे. मागील काही तासांपासून विद्यार्थी बालगंधर्व चौकातील झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, भाजप आमदार अभिमन्यू पवार, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह विविध नेत्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. तरीदेखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहिले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांबाबत माहिती घेतली. यानंतर येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेणार असून मीही त्या बैठकीला उपस्थित राहीन असं आश्वासनही शरद पवार (Sharad Pawar)यांनी दिलं आहे.

पवार म्हणाले, आंदोलनस्थळी येताना माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसांत यावर चर्चा करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होणाऱ्या संबंधित बैठकीला कोण-कोण हजर राहणार? अशा पाच विद्यार्थ्यांची नावंही आपल्याला कळवावीत. या पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ घेऊन मी या बैठकीला जाईल असं आश्वासन शरद पवारांनी दिलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांनी उपोषण स्थगित केले होते. मात्र, जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर विद्यार्थी ठाम आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT