Sharad Pawar and Parth Pawar meeting on NCP merger 2026 Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवार, पार्थ पवार अन् जय पवारांमध्ये बैठक, अजितदादांची बहीणही उपस्थित; विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय?

Sharad Pawar Parth Pawar Jay Pawar Meeting : विद्या प्रतिष्ठाणमध्ये शरद पवार पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये बैठक होत आहे. या बैठकीला अजित पवारांची बहीण विजया पाटील या देखील उपस्थित आहेत.

Roshan More

Ajit Pawar Family Meeting : ज्येष्ठ नेते शरद पवार हे बारामतीमध्ये आहेत. ते अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठाण संस्थेमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शरद पवारांसह पार्थ पवार, जय पवार आणि अजित पवारांची बहीण विजया पवार या उपस्थित आहेत.

मागील एका तासपासून ही बैठक सुरू आहे. कौटुंबीक बैठक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या बैठकीच्या दोन तीन विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. 'साम टिव्ही'ने दिलेले वृत्तामध्ये बैठकीत प्रमुख विषय विलीनीकरणाचा असल्याचे सांगितले आहे.

विद्या प्रतिष्ठाणमध्ये होत असलेल्या बैठकीला विद्या प्रतिष्ठाणचे विश्वस्त देखील उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. बैठकीत नेमकी काय चर्चा सुरू आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र विद्या प्रतिष्ठाणच्या विश्वस्त पदावर पार्थ पवार की जय पवार या पैकी कोणाला संधी द्यायची याची देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

सुनेत्रा पवारांना संधी, आनंद आहे

शरद पवार यांच्याशी आज सकाळी पत्रकारांनी संवाद साधला. या संवादामध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, संधी मिळाली, शपथ घेतली याचा आनंद आहे. तसेच विलीनीकरणाच्या चर्चेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले ते चर्चेत नव्हते त्यामुळे त्यांना यावर भाष्य करण्याचा अधिकार आहे का? हे मला माहीत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT