Sharad Pawar Sarkarnama
पुणे

NCP Sharad Pawar : पवार गटाला मिळणार नवे निवडणूक चिन्ह; आयोगाकडे 'या' तीन चिन्हांचा प्रस्ताव

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar NCP News Pune :

गोविंद बागेतील बैठकीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठी माहिती दिली. राष्ट्रवादी पवार गट आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या या चर्चेला अमोल कोल्हे यांनी पूर्णविराम दिला. या बातम्या का पेरल्या जातात हे माहिती नाही.

मात्र जेव्हा अशा चर्चा होतात तेव्हा नक्कीच शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाचा दरारा आणि त्यांची जनमाणसात असणारी प्रतिमा या दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित होतात. त्यामुळे अशा बातम्या पेरल्या जातात, असे खासदार Amol Kolhe कोल्हे यांनी स्पष्ट केले.

पक्षाच्या चिन्हाबाबत लवकरात लवकर सर्वांना माहिती दिली जाईल. जनतेपर्यंत ते चिन्ह पोहोचवले जाईल. चिन्हाच्या मुद्द्यावर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. तसेच आम्ही निवडणूक आयोगाकडे जे काही पर्याय दिले आहेत.

त्याबाबत लवकरच एक चिन्ह मिळेल. ते चिन्ह लवकरात लवकर जाहीर केले जाईल, असे कोल्हे म्हणाले. Sharad Pawar गटाकडून निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांचा प्रस्ताव दिला आहे. कपबशी, वडाचे झाड आणि शिट्टी अशा तीन चिन्हांचा प्रस्ताव शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'भाजपमध्ये घबराट'

महाविकास आघाडी आणि 'इंडिया' आघाडी म्हणून आपल्याला पुढे ठामपणे सामोरे जायचे आहे, असे आजच्या बैठकीत ठरले. मुळात सत्ताधारी भाजपमध्ये सध्या घबराटीची परिस्थिती आहे. एकीकडे 400 पार सांगितले जात आहे.

पण बिहार, झारखंडमध्ये आणि महाराष्ट्रात नुकतंच जे घडलं तर अब की बार 400 पार असते तर नेते फोडण्याची मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची, काही पक्ष पळवण्याची ही गरज का पडली असती? हे जनतेला पूर्ण ठाऊक आहे, असा टोला खासदार अमोल कोल्हेंनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT