Harshada Deshmukh-Jadhav Candidature Pune Graduate Election  sarkarnama
पुणे

Sharad Pawar NCP : सस्पेन्स संपला! शरद पवारांचा हर्षदा देशमुख-जाधवांवर विश्वास, उमेदवारीसाठी भैय्या मानेंची चर्चा पण…

Harshada Deshmukh-Jadhav : देशमुख यांच्या मागे महाविकास आघाडीने आपली ताकद उभी केली आहे. त्यामुळे पदवीधरमध्ये काटे की टक्कर होणार असल्याची चर्चा आहे.

Roshan More

Pune Graduate Election : पुणे पदवीधर मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हर्षदा देशमुख-जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीत झालेल्या बंडखोरीमुळे अपक्ष लढणारे भैय्या माने यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र, पवारांनी हर्षद देशमुख-जाधव यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली.

त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री शशिकांत शिंदे, विधिमंडळ पक्षनेते आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज पाटील (काँग्रेस), आमदार विश्वजीत कदम (काँग्रेस), निरीक्षक (अहिल्यानगर) माननीय अंकुश काकडे, प्रभाकर देशमुख, वसंत मोरे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

देशमुख यांच्या मागे महाविकास आघाडीने आपली ताकद उभी केली आहे. त्यामुळे पदवीधरमध्ये काटे की टक्कर होणार असल्याची चर्चा आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडूनही मंगेश चिवटे यांनी अर्ज भरला आहे. यापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे यावेळी भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे या निवडणुकीची जबाबदारी भाजपने नंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली आहे.

मराठवाड्यातही बंडखोरी

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन टर्म आमदार राहिलेले सतीश चव्हाण यांच्या विरोधात भाजपाच्याच एम. के. देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांच्या नावाची आघाडीकडून अधिकृत घोषणा झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डाॅ. प्रतापसिंह पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

SCROLL FOR NEXT