Vikas Lawande FB Post ON Warkari Community News Sarkarnama
पुणे

Vikas Lawande News: जामीन मिळताच विकास लवांडेंची नवी फेसबुक पोस्ट; वारकरी संप्रदायाचा पुन्हा उल्लेख

Vikas Lawande FB Post ON Warkari Community News: जामीन मिळाल्यानंतर विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाबाबत पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट केली असून, त्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : वारकरी संप्रदाय आणि संतांविषयी समाजमाध्यमांवर अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.

जामीन मंजूर करताना लवांडे यांना काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यांना पुन्हा वादग्रस्त विधान करण्यास बंदी घातली आहे. त्यानंतर आज विकास लवांडे यांनी समाज माध्यमांवर वारकरी संप्रदाय आणि त्यातील घुसखोरी संबंधात एक पोस्ट केली आहे.

संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातील वैचारिक प्रदूषण अर्थात वैचारिक घुसखोरी रोखण्यासाठी मी चळवळ व जनजागृती सुरु केल्यापासून गुंड प्रवृत्तीकडून माझ्यावर झालेला जीवघेणा हल्ला असो की पुणे पोलिसांनी खोटया तक्रारीच्या आधारे बेकायदा व मनमानी पद्धतीने मला अटक असो, त्यानंतर माझी जेलमधून सुटका होईपर्यंत माझ्या समविचारी असलेल्या कार्यकर्ते व विविध संघटनाचे प्रतिनिधी, काही मित्र अशा ज्ञात-अज्ञात अनेकांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेगवेगळ्या माध्यमातून पाठबळ दिले आहे, असे लवांडे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राज्यातील अनेक वारकरी असलेले मान्यवर सोबतच माझे वकील मिलिंद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महाविकासआघाडीचे नेते यांच्या सर्वांचा मी आभारी आहे. माझी वैचारिक, तात्विक व सांस्कृतिक चळवळ आगामी काळात आपल्या सर्व समविचारी कार्यकर्ते आणि समस्त अभ्यासू वारकऱ्यांच्या सहभागातून सनदशीर मार्गाने सुरूच राहील, असे लवांडे यांनी म्हटलं आहे.

बुडते हे जन न देखवे डोळा।

संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातील मनुवादी, वर्णवर्चस्ववादी, धर्मांध प्रवृत्तीचे वैचारिक प्रदूषण व घुसखोरी रोखण्यासाठी राज्यातील खऱ्या आणि अभ्यासू वारकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने पुढे यावे लागेल.

त्यामुळे ही चळवळ निर्भयपणे निरंतर चालू ठेवावी लागेल. ही चळवळ कोणत्याही व्यक्तींविरुद्ध नसून प्रवृत्ती विरुद्ध आहे. संतांचे शुद्ध आचार विचार आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे त्याचे लवांडे यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT