Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : छत्रपती संभाजीराजांना 'धर्मवीर' बोलणं चुकीचं नाही ; पवारांची भूमिका!

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे आता भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी धर्मवीर की स्वराज्यरक्षक या वादावर भाष्य केले आहे. संभाजी महाराजांना काही लोक धर्मवीर म्हणत असतील तर त्यात काहीच वावगं नाही. महाराजांना धर्मवीर असं बोलणं काही चुकीचं नाही. संभाजी महाराज हा आस्थेचा विषय आहे, त्या भावनेतून कोणी धर्मवीर म्हणा की, स्वराज्यरक्षक म्हणा आपल्याला काहीच अडचण नाही, असे पवार यांनी भूमिका स्पष्ट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांच्या वक्तव्याबाबत तशरद पवार म्हणाले की, ते स्वत: माध्यमांसमोर येऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील.

काय म्हणाले होते अजित पवार?

नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत एक वक्तव्य केले होते. अजित पवार म्हणाले, “ छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख आपण नेहमी स्वराज्यरक्षक असाच करतो. मात्र महाराजांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, मात्र काही जण जाणीवपूर्वक संभाजी महाराजांचा उल्लेख धर्मवीर असा करतात,” असे अजित पवार यांनी म्हंटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT