ajit pawar sharad pawar sarkarnama
पुणे

VIDEO : "बारामतीतून लढण्यात रस नाही," अजितदादांच्या विधानावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Ajit Pawar : अजितदादांनी बारामतीतून लढण्यास रस नाही, असं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

Akshay Sabale

बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यात कोणताही रस नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलं होतं. अजितदादा पवार यांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अजित पवार यांच्या मनात नक्की काय आहे? मला माहिती नाही, असं पवारसाहेबांनी ( Sharad Pawar ) म्हटलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

अजितदादा काय म्हणाले होते?

बारामतीमधून जय पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. याबद्दल गुरूवारी ( 15 ऑगस्ट ) प्रश्न विचारल्यावर आपल्याला बारामतीतून निवडणूक लढविण्यात कोणताही रस नसल्याचं अजितदादांनी ( Ajit Pawar ) म्हटलं होतं. "स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि पक्षाच्या संसदीय समितीचा निर्णय असेल तर जय यांना उमेदवारी मिळू शकते," असं अजितदादांनी सांगितलं होतं.

पवारसाहेबांनी काय म्हटलं?

याबद्दल सोमवारी ( 19 ऑगस्ट ) पुण्यात प्रसारमध्यमांनी शरद पवारसाहेबांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवारसाहेब म्हणाले, "सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका त्यांनी बजावलेली असते. त्यांना आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जिथे अनुकूल वातावरण वाटायला लागते, तिथे जनरली, असं करतात. अजित पवार यांच्या मनात नक्की काय आहे? मला माहिती नाही."

सुनील तटकरे काय म्हणाले?

अजितदादांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलेलं, "आगामी विधानसभा निवडणूक अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून लढवल्या जातील. एखाद्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाते तेव्हा त्या नेतृत्वानेसुद्धा निवडणूक लढवावी असे अभिप्रेत असते. अजितदादांनी केलेले वक्तव्य कोणत्या अनुषंगाने केले हे मला माहीत नाही. मात्र, संसदीय बोर्ड आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून अजित पवार हे विधानसभेच्या रिंगणात असतील."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT