Ajit Pawar-NCP-Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Baramati Politics VIDEO: घर कुणी फोडलं? दादांच्या प्रश्नावर साहेबांनी सगळंच सांगितलं! सर्व भाऊ माझे आधार...

Baramati Assembly Election 2024: घर फोडण्याचं पाप मला आई-वडील- भावांनी शिकवलं नाही. सर्व भाऊ माझे आधार होते, त्यांनी शेतीकडे लक्ष दिले म्हणून मी राजकारणासाठी देशभर हिंडत राहिलो. ते माझ्या भावांच्या पाठिब्यामुळेच...

Mangesh Mahale

Sharad Pawar News: घर कुणी फोडलं? यावरुन बारामती विधानसभा मतदारसंघात राजकारण रंगलं आहे. काल (सोमवारी) अजित पवार यांनी या मुद्दावरुन शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर पवारांनी आज अजितदादांवर घणाघात केला.

"कुटुंब कसं एक राहिलं हे मी केले. अनेकांना मी पदं दिलं. सुप्रियाला (सुप्रिया सुळे) मी एक पद दिले. दुध संघ व अन्य संस्था तुम्हाला (अजित पवार) दिल्यात. सर्व अधिकार तुम्हाला दिले.एकाही माणसाची निवड मी केली नाही,"

"मी घर फोडलं असे सांगण्यात आले. घर फोडण्याचे काहीही कारण नाही. घर फोडण्याचं पाप मला आई-वडील- भावांनी शिकवलं नाही. सर्व भाऊ माझे आधार होते, त्यांनी शेतीकडे लक्ष दिले म्हणून मी राजकारणासाठी देशभर हिंडत राहिलो. ते माझ्या भावांच्या पाठिब्यामुळेच," अशा शब्दात पवारांनी अजितदादांना सुनावलं.

"घर फोडण्याचं पाप माझ्या भावांनी मला शिकवलं नाही. त्यांना माझ्याकडून अंतर होणार नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले. युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.

"माझ्या आईने माझ्या दादांच्या विरोधात (अजितदादा) अर्ज भरु नको, असे सांगितले होते. पण तरीही त्यांनी अर्ज भरला. त्यांना विचारलं कुणाच्या सांगण्यावरुन फॉर्म भरला, तर म्हणतात साहेबांनी सांगितले...मग आम्ही असे म्हणायंच का साहेबांनी आमचं तात्या साहेबांचं घर फोडलं का? असेही अजित पवार काल म्हणाले होते. शरद पवार यांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करून त्यांनी घरफोडीबाबत विधान केलं होतं. त्यावर पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.

"मी काढलेल्या पक्ष माझ्याकडून काढून घेण्यात आला. केंद्राकडून पक्ष फोडण्याची चक्र फिरली. काही लोकांनी आमच्यावर खटला भरला. पक्ष आणि चिन्ह यासाठी ते कोर्टात गेले. कोर्टात माझ्या नावाने समन्स काढले. समन्स कधी पाहिल नव्हतं. यापूर्वी मी कोर्टात उभा राहिलो नाही. कोर्टानं निकाल दिला, पक्ष चिन्ह दुसऱ्याचे शरद पवारांचा काही संबंध नाही, असे कोर्ट म्हणाले. त्यानंतर पक्ष-चिन्ह दोन्ही गेलं. आम्हाला नवीन चिन्ह दिलं. तुम्हाला विनंती केली आमचे उमेदवार निवडून द्या," असे पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT