Sharad Pawar-Chhagan Bhujbal  Sarkarnama
पुणे

Video Sharad Pawar : छगन भुजबळांच्या भेटीवर शरद पवारांचा टोला, म्हणाले, 'मला मार्गदर्शन...'

Sharad Pawar on chhagan Bhujbal Meeting : जरांगे आणि ओबीसींना काय आश्वासन दिले हे जाहीर होत नाही तोपर्यंत बैठकीला जाण्यात अर्थ नाही.अंगाशी आल्यावर ते माझ्याकडे आले, असे म्हणत राज्यसरकारवर पवार यांनी टीका केली.

Roshan More

Sharad Pawar News : छगन भुजबळ यांनी बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जनसन्मान रॅलीमध्ये शरद पवारांवर टीका केली. मात्र, टीकेला 24 तास होण्याच्या आधी छगन भुजबळ हे शरद पवारांचे निवास्थान 'सिल्वर ओक'वर पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते. या भेटीत काय घडले याची माहिती देताना शरद पवारांनी आपल्या खास शैलीत छगन भुजबळांना टोला लगावला.

शरद पवार म्हणाले, हल्ली त्यांची (भुजबळ) दोन भाषणं छान झाली. त्यांनी दोन्ही भाषणामध्ये माझ्या विषयीची प्रचंड आस्था व्यक्ती केली. आणि त्याच्यानंतर ते मला भेटायला आले. मला दोन दिवस बरं नव्हतं. दोन दिवस ताप होता. त्यामुळे मी झोपून होतो. भुजबळ भेटायला आल्याचे कळल्यानंतर मी त्यांची भेट घेतली.

'त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी केल्या पाहिजे त्यात महाराष्ट्राचे हित आहे. शातंता निर्माण करण्यासठी तुमची गरज असल्याची मार्गदर्शन छगन भुजबळ यांनी मला केले आहे. ', असे शरद पवार Sharad Pawar म्हणाले.

अंगाशी आल्यावर माझ्याकडे आले

मनोज ⁠जरांगे- पाटील आणि मुख्यमंत्र्यांचा Eknath Shinde संयुक्त कार्यक्रम मी पाहिला. म्हणजे त्यांचा काहीतरी डायलॅाग होता. ओबीसींचे आंदोलन सोडवण्यासाठी चार पाच मंत्री गेले होते. पण या दोन्ही ठिकाणी काय ठरले? जरांगे आणि ओबीसींना काय आश्वासन दिले हे जाहीर होत नाही तोपर्यंत बैठकीला जाण्यात अर्थ नाही.अंगाशी आल्यावर ते माझ्याकडे आले, असे म्हणत राज्यसरकारवर पवार यांनी टीका केली.

आरक्षणावर सामंजस्याची भूमिका घ्यावी

शरद पवारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचे कान टोचले आहे. सरकारने मनोज जरांगे आणि ओबीसी आंदोलनकर्त्यांना काय कमिटमेंट केली आहे हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला आम्ही गेलो नाही. मात्र,सरकारने आरक्षणावर सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT