Sharad Pawar sarkarnama
पुणे

Sharad Pawar : शरद पवार बारामतीत पोहोचले, हॅलिकाॅप्टरमधून उतरताच...

Ajit Pawar Death Sharad Pawar : शरद पवार यांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दिल्लीहून रवाना झाले होते.

Roshan More

Sharad Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामतीत विमानअपघातत निधन झाले. पवार कुटंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. बारामतीसह महाराष्ट्रातील नागरिक शोक व्यक्त करत आहेत.

शरद पवार यांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दिल्लीहून रवाना झाले होते. त्यांच्यासोबत प्रतिभा पवार या देखील होत्या. दुपारी दीडच्या सुमारास हॅलिकाॅप्टरने बारामतीत पोहोचले. हॅलिकाॅप्टरमधून उतरताच त्यांनी नेमका अपघात कसा घडला, याची माहिती घेतली. त्यानंतर ते रुग्णालयाकडे रवाना झाले.

जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे असेच म्हणावे लागेल. अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे. अजितदादा आणि माझे गेल्या जवळपास ३५ ते ४० वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते. प्रदीर्घकाळ आम्ही एकत्र काम केले.

महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच अशा प्रकारे अजित दादांचे अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेलेले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान कधीही भरून निघणार नाही.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांचं अकाली जाणं जीवाला चटका लावणारं आहे अशा भावपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही बारामतीसाठी रवाना होत आहेत. राज्यात आज शासकीय सुटी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशा भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT