Sharad Pawar to Pandurang Zagde Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : नव्या पालवीत जुन्या खोडाची ओळख; कन्हेरीच्या सभेत पुन्हा पवारांच्या स्मरणशक्तीची चुणूक

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे धोरणी राजकारणी म्हणून अनेक किस्से सांगितले जातात. तसेच त्यांच्या स्मरणशक्तीबाबतही ठिकठिकाणच्या लोकांना अनुभव आलेले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा शुभारंभ परंपरेनुसार कन्हेरीतून करण्यात आला. यावेळी पवारांनी त्यांचे जुने सहकारी पांडुरंग झगडे यांस अचूकपणे ओळखले. भरसभेत त्यांचा मिनीटभर संवाद झाला. त्यावेळी उपस्थितींनी पवारांच्या नावाचा एकच जल्लोष केला.

शरद पवारांनी Sharad Pawar बदलत्या काळाशी मैत्री करत आपले राजकारण केले. ज्येष्ठ लोकांसह युवा पिढीलाही पवारांची भूरळ पडलेली आहे. राजकारणात पवारांनी तरुणांसह महिलांना बळ दिला. असे करताना त्यांनी कधीही आपले जुने सहकारी, मित्रांना अंतर दिले नाही. अनेक वर्षांनंतर ते आपल्या तरुण काळातील सहकाऱ्यांना नावासह ओळखतात. असाच किस्सा कन्हेरीच्या सभेतही घडला.

कन्हेरी येथील मारुतीच्या मंदिरात खासदार सुळेंच्या Supriya Sule प्रचारांचा नारळ फुटल्यानंतर पवारांची सभा झाली. या सभेत त्यांनी पुढे बसलेले ज्येष्ठ नागरिक पांडुरंग झगडेंना ओळखले. बोलण्यास उभे राहिलेल्या पवारांनी अचनाकच तुम्ही झगडे ना? तुम्ही झगडे गुरुजी ना? असा प्रश्न केला. त्यावर झगडे गुरुजी उठून म्हणाले, हो मीच! त्यानंतर पवार म्हणाले, बरे आहात का? यावर झगडेंनी हात हालवून एकदम ठणठणीत आहे, असे सांगितले. आता वय किती? असेही पवारांनी विचारले. 94 वर्षे, असे झगडेंनी उत्तर दिले. त्यावर, माझ्यापेक्षा दहा वर्षांनी वडील...? भारीच आहे राव... असे पवार म्हणाले.

पवार आणि झगडे यांच्यातील संवाद ऐकून उपस्थितांनी एकच टाळ्यांचा कडकडाट केला. यापूर्वीही दौंडमधील यवतच्या सभेत पवारांनी वर्गमित्राला 'तू भिवा शेलार का रे? असे म्हणूत भिवा शेलारांना ओळखले होते. तसेच जुन्नरच्या सभेत व्यासपीठापासून दूरवर घोषणा देणाऱ्या शेतकऱ्यालाही कोंडाजी वाघ या नावासह ओळखून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT