Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : तब्येत बिघडली तरी शरद पवारांचे काम सुरूच; हालचालींना वेग

Baramati Lok Sabha Constituency : शरद पवारांनी रोज जास्तीत जास्त चार तास झोप घेतली होती. दिवसाला तीन सभा, 20-25 बैठका घेत होते. तसेच त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रवासही केला. त्यातून अतीताण आल्याने त्यांची तब्येत बिघडली आहे.

Sudesh Mitkar

Baramati Political News : बारामती लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आपल्या उमेदवारांसह महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभर फिरत आहेत. त्यामुळे त्यांचा रविवारी सकाळीच घसा बसला होता. त्यांनी बारामतीची सांगता सभा गाजवली. त्यानंतर मात्र पवारांची तब्येत बिघडल्याचे समोर आले. अशा स्थितीतही ते काम करत असल्याचे रोहित पवारांनी सांगितले आहे.

प्रकृती अस्वास्थामुळे पवारांचे Sharad Pawar सोमवारी (ता. 6) होणारे सर्व दौरे, कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबतची आमदार रोहित पवार यांनी माहिती दिली. ते म्हणाले, काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या स्ट्रेसमुळे त्यांना कणकण आल्याचे डॉक्टरांनी निदान केले आहे. गेल्या वीस दिवसांमध्ये शरद पवारांनी रोज जास्तीत जास्त चार तास झोप घेतली होती. दिवसाला तीन सभा, 20-25 बैठका घेत होते. तसेच त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रवासही केला. त्यातून अतीताण आल्याने त्यांची तब्येत बिघडली आहे. मात्र अशा परिस्थितीतही शरद पवार सगळीकडे फोन करून काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेत आहेत, असेही रोहित यांनी सांगितले.

दरम्यान, बारामतीतील सभेत रोहित पवारांना Rohit Pawar अश्रू अनावर झाले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सडकून टीका केली. त्यांना उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, एक बारामतीकर म्हणून मी ते भाषण केले. पवार कुटुंबातील सदस्य म्हणून केलेले ते भाषण होते. अजित पवार वारंवार शरद पवारांचे वय काढतात, त्यावेळी खूप वाईट वाटते. त्यामुळे मी भावनिक झालो होतो. त्यामध्ये कुठलेही मतदान आम्हाला मिळावे असा हेतू नव्हता, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरे राखीव खेळाडू

राज ठाकरे Raj Thackeray यांनी नारायण राणे यांच्यासाठी सभा घेतली आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर ते राज्यभर शंभर एक सभा घेतील असे वाटले होते. मात्र आतापर्यंत त्यांनी एकच सभा घेतली आहे. त्यांना मुंबईसाठी रिझर्व्ह ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या शेवटी शेवटी मुंबईमध्ये सभा होण्याची शक्यता आहे. मात्र 2019 साली त्यांनी मोदींविरोधात सभा घेतल्या त्याच योग्य होत्या. आताही घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांची गल्लत होत आहे. त्यांचे मन एक सांगते आणि ते कृती वेगळी करत आहेत, असेही पवारांनी म्हटले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT