Sharad Pawar sarkarnama
पुणे

Sharad Pawar : कीव येते, अतिशय असंवेदनशील सरकार; शरद पवार भर पावसात सरकारवर बरसले

Sudesh Mitkar

Pune News : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीने आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला. यानंतरही हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आलं.

महाविकास आघाडीचे बहुतांश नेते हे तब्बल एक तास पावसात बसून या आंदोलनात सहभागी झाल्याचा दिसून आलं. "सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या आंदोलनाला राजकीय म्हणणे, म्हणजे यातून सरकारचा बदलापूर घटनेविषयी असंवेदनशीलपणा समोर येतो. सरकारची कीव येते", असा शब्दात शरद पवार यांनी सरकारवर टीका केली.

बदलापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा व सरकारच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने 24 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने (Court) परवानगी नाकारल्याने महाराष्ट्र बंद मागे घेऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत एक तासाचे मुक आंदोलन पुण्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे करण्यात आले.

या आंदोलनात विशेष करून काँग्रेस (Congress), शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सर्व पक्षांच्या नेते झाडून या आंदोलनाला उपस्थित असल्याचा पाहायला मिळाले. यावेळी शरद पवार यांनी तोंडाला काळा मास्क लावून तसंच इतर नेत्यांनी काळ्याफिती बांधून निषेध नोंदवला. आंदोलनाच्या शेवटी शरद पवार यांच्यासह सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महिला सुरक्षितेची सामूहिक शपथ घेतली.

शरद पवार म्हणाले, "बदलापूर येथे घटलेल्या घटनेमुळे महाराष्ट्राच्या देशभरामध्ये असलेल्या लौकिकाला धक्का बसला आहे. महिला अत्याचाराची घटना सातत्याने महाराष्ट्रात घडत आहेत. एक दिवस, असा जात नाही की ज्या दिवशी महिला अत्याचाराची घटनासमोर येत नाही. महाराष्ट्र सरकारने या घटना गांभीर्याने घेऊन याबाबत संवेदनशील भूमिका घेणे आवश्यक आहे". छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्री अत्याचाराबाबत कठोर भूमिका घेतली जात असे, त्यावेळी पाटलांचे हात तोडले गेले होते, मुली बाळींवर अत्याचार झाला आणि त्याचा निषेध केला, तर सत्ताधाऱ्यांना विरोधकांचे आंदोलन राजकारण आहे, असं वाटतं. हे अत्यंत दुर्दैवी आहे. यातून सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येतं. सरकारची कीवच येते, अशी भूमिका शरद पवार यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT