Sharad Pawar NCP Manifesto Sarkarnama
पुणे

Sharad Pawar NCP Manifesto 2024: स्पर्धा परीक्षांची फी माफ करणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'गॅरंटी'

Sharad Pawar NCP Party: शासकीय नोकऱ्यांमध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी प्रयत्न करणार. शासकीय नोकरीमध्ये महिलांचं आरक्षण 50% ठेवण्याचा प्रयत्न करणार, तसेच अप्रेंटिसशिप करताना सक्तीचं स्टायपेंड देण्याचं कायदा करणार असल्याच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.

Sudesh Mitkar

Sharad Pawar NCP Manifesto 2024 Key Points: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. जाहिरनामा प्रकाशित करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या जाहीरनाम्यात समाजाचे विविध प्रश्न समोर ठेवून अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. (Sharad Pawar's Party Releases Manifesto)

जाहिरनामा प्रकाशित करताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्वयंपाक गॅसच्या किमती 500 रुपयांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार असून यासाठी सबसिडी देण्यात येणार आहेत. तसेच पेट्रोल-डिझेलचे दर मर्यादित करण्यासाठी प्रयत्न करणार असं पाटील यांनी आश्वासन दिलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांकडून जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव देण्यात आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शासकीय नोकऱ्यांमध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी प्रयत्न करणार. शासकीय नोकरीमध्ये महिलांचं आरक्षण 50% ठेवण्याचा प्रयत्न करणार शिवाय अप्रेंटिसशिप करताना सक्तीचं स्टायपेंड देण्याचं कायदा करणार आणि स्पर्धा परीक्षांसाठी आकारण्यात येणार परीक्षा शुल्क बंद करणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली.

महिलांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी

तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेणार. शेती करण्याच्या नवनवीन पद्धती आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार. जातीय जनगणना करण्यासाठी आग्रही भूमिका घेणार. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग निर्माण करणार. खाजगी शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाची सुविधा निर्माण करण्यात येणार. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोगाची निर्मिती करणार असून आरोग्य विषयक सोयी सुविधांसाठी अर्थसंकल्पामध्ये चार टक्के अतिरिक्त निधी देण्याचा प्रयत्न करणार. शिवाय शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतूद सहा टक्क्याने वाढवणार असल्याची घोषणादेखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून करण्यात आली.

शेतीमालावरील जीएसटी एसटी रद्द करणार. वन नेशन वन इलेक्शन , चीनकडून करण्यात येणारे घुसकरी याबाबत पक्षाचे खासदार संसदेत आवाज उठवणार. सक्षम न्यायव्यवस्था करण्यासाठी आवश्यक बजेट पुरवणार. कामगारांचं वेतन हे चारशे रुपये प्रतिदिन असलं पाहिजे याबाबत सरकारमध्ये आल्यास नियोजन करणार. सरकार आल्यास कंत्राटी भरती रद्द करण्यात येणार .गरिबांसाठी रेशन कार्डाच्या मर्यादित सुधारणा करणार.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT