Sharad Pawar  Sarkarnama
पुणे

Sharad Pawar Solapur Visit : शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द; काय आहे कारण ?

NCP Politics : गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांच्या माढा दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

अनुराधा धावडे

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा माढा-पंढरपूर दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांच्या माढा दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आयोजकांनी आजच्या दौऱ्याची मोठी तयारीही केली होती, पण अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.

शरद पवार सध्या बारामतीत असून, ते सोलापूरला न जाता पुण्याला येणार आहेत; पण हा दौरा रद्द का करण्यात आला, याचे कोणतेही कारण समोर आलेले नाही. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमुळे शरद पवार यांचा सोलापूर दौरा पुढे ढकलल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार हे सध्या बारामतीत आहे. बारामतीतून सोलापूरला न जाता शरद पवार थेट पुण्याला जाणार आहेत.

शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील आज पंढरपूर आणि माढा दौऱ्यावर होते. माढ्यातील कापशी येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला आणि त्यानंतर दुपारी पंढरपुरात होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचे हे सर्व दौरे आता रद्द करण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे, अजित पवार यांच्या दौऱ्यात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यांचे सर्व नियोजित दौरे होणार आहेत. माढ्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. मात्र, मराठा आंदोलकांनी त्यांच्या या दौऱ्याला विरोध केल्याचीही माहिती समोर आली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT