sheetal tejwani ravbir Kapoor Sarkarnama
पुणे

Sheetal Tejwani : शितल तेजवानीचा नवा 'कारनामा', रणबीर कपूरविरुद्ध ठोकला 50 लाखांच्या नुकसान भरपाईचा दावा; नेमकं काय आहे प्रकरण?

Sheetal Tejwani Compensation case against Bollywood star Ranbir Kapoor : शितल तेजवानीने रणबीर कपूरविरुद्ध 50 लाखांच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. नेमकं प्रकरण काय आणि वादाची सुरुवात कशी झाली जाणून घ्या.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार त्यांचं नाव देखील घेतलं जात आहे. तसेच याप्रकरणात मुख्य आरोपी म्हणून शितल तेजवानी यांचं नाव समोर आला आहे. त्या पोलिसांच्या अटकेत आहेत.

सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शीतलतेजवानी यांची चौकशी सुरू असून या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. असाच एक थेट बॉलीवूडशी संबंधित असणारा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. त्यामुळे आता शितल तेजवानीच्या बॉलीवूड कनेक्शनची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

पोलीस कोठडीत असलेल्या शीतल तेजवानीची पुणे पोलीस कसून चौकशी करत आहे. या चौकशीत तेजवानी यांचा बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबतचा एक वाद समोर आला आहे. या प्रकरणात तिने बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरवर याच्या विरोधात तब्बल 50 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हा वाद पुण्यातील ट्रम्प टॉवरमधील एका फ्लॅटच्या भाडेकराराशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.

शितल तेजवानी आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये एक भाडेकरार झाला आहे. तेजवानीचा आरोप आहे की रणबीर कपूर याने फ्लॅटच्या भाडेकरारातील अटींचे उल्लंघन केले आहे. विशेषत: लॉक-इन कालावधी न पाळल्याने तेजवानी यांना तोटा झाला असून तो भरून देण्यासाठी त्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. संबंधित दावा दिवाणी न्यायालयात प्रलंबित असून येत्या 5 जानेवारी 2026 रोजी याबाबत पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान, मुंडवा जमीन या मोठ्या गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीतील 1% पार्टनर दिग्विजय पाटील यांच्यावरही संशयाची सुई आहे. त्यांची एक वेळ चौकशी करण्यात आली असून पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे . मात्र मुंढवा जमीन घोटाळ्यावरून शीतल तेजवानी आणि सूर्यकांत येवले यांच्यावर आर्थिक गुन्ह्यांचा गुन्हा नोंद झाला असून प्रकरणात काहींना अटक करण्यात आली आहे.आता तपासाची सूत्र वेगाने फिरत आहेत.

तर या प्रकरणात रवींद्र तारू यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या संबंधित असणाऱ्या अमेडिया कंपनीच्या भोवती फास आवळला जाणार का आणि पार्थ पवार यांच्यावरती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT