Mahadev Jankar
Mahadev Jankar Sarkarnama
पुणे

शिंदे सरकारबाबत महादेव जानकरांचा मोठा दावा; म्हणाले, ‘हे सरकार...’

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि भाजप (BJP) सरकारचा शपथविधी झाला आहे, त्यांच्यावर लगेच गैरविश्वास दाखविणे योग्य नाही. या सरकारला काम करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांची विकासकामे आपण पाहिली पाहिजेत, जो काही न्यायनिवाडा होईल, तो जनतेतून होईल. हे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा आपल्याला विश्वास वाटतो, असे राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी स्पष्ट केले. (Shinde group-BJP alliance government will complete its term : Mahadev Jankar)

इंदापूर येथे आमदार महादेव जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी इंदापूरच्या वैभवात भर घालणाऱ्या अकलूज चौकातील विठ्ठल मूर्तीचे त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी वरील दावा केला आहे.

महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आपला पक्ष त्यांच्यासोबत राहील, असे स्पष्ट केले. त्यानंतर पुढे अकलूजमार्गे जात असताना इंदापूर तालुक्यातील सुरवड या गावी एका पालखीच्या दिंडीत ते सहभागी झाले. त्यावेळी ते मृदंगाच्या तालावर टाळ वाजवीत पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाले.

माजी मंत्री, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष असलेले महादेव जानकर यांनी प्रवासादरम्यान दुपारी कार्यकर्त्यांनी बांधून आणलेली भाजी भाकरीचा आस्वाद घेतला. त्यामुळे जानकर यांचा साधेपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे. जानकर यांच्यासोबत रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, पक्षाचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. संजय माने, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफने, पुणे जिल्हा नेते तानाजी शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, जिल्हा सरचिटणीस तानाजी मारकड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT