Pimpri-chinchwad Politics
Pimpri-chinchwad Politics 
पुणे

PCMC News : राज्यपालांना हटवण्यासाठी शिंदे गटाचे नेते टार्गेटवर; बारणेंच्या घरासमोर आंदोलन

सरकारनामा ब्युरो

Pimpri-chinchwad Politics : छत्रपती शिवाजी महाराजांवरील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत.ते शमण्याची चिन्हे नाहीत.अखिल भारतीय छावा संघटनेने,तर अभिनव निषेध म्हणून राज्यपालांना तुटक्या चपलांचा आहेर काल पाठवला.तसेच त्यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील निवासस्थानाबाहेर कोश्यारींच्या निषेधार्थ आंदोलनही केले.

दरम्यान, राज्यपालांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवरायांचा अवमान करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सदाशिव तळेकर या पिंपरी-चिंचवडकर तरुणाने पिंपरी पोलिसांकडे केली आहे.तशी तक्रार त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात दिली.महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलणे गुन्हा आहे असल्याने यासंदर्भात राज्यपालांविरुद्ध तो दाखल करावा,असे त्यांनी त्यात म्हटले आहे.असे प्रकार वेळीच थांबले नाही, तर उद्या कोणीही आपल्या महापुरुषांबद्दल काहीही बोलण्यास मागेपुढे पाहणार नाही, त्यातून महाराष्ट्र पेटण्याची अशी भीती त्यांनी व्यक्त केली.यापूर्वीही कोश्यारींनी अशी अवमानकारक विधाने केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शिवरायांचा वारंवार अपमान करणाऱ्या राज्यपालांना हटवले नाही,तर राजभवनवर आमच्या स्टाईलने आंदोलन करू,असा इशारा छावा संघटनेने काल दिला. त्यांनी राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ स्थानिक खासदार बारणेंच्या थेरगाव येथील बंगल्याबाहेर आंदोलन केले. नंतर राज्यपालांचा निषेध म्हणून त्यांना तुटक्या चपलांचा जोड आहेर म्हणून पाठवून दिला. छावाचे प्रदेश महासचिव मनोजअण्णा मोरे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व्यापारी आघाडी सुधाकर पोळ,पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष गणेश जाधव, उपाध्यक्ष गौतम वाहूळे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन भिसे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष अक्षय बोडके , विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बिट्टू पांचाळ, पुणे शहर उपाध्यक्ष युवा राहुल निंबाळकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT