Google Trend, Eknath Shinde trending on Google, Eknath Shinde news
Google Trend, Eknath Shinde trending on Google, Eknath Shinde news sarkarnama
पुणे

Eknath Shinde : ३३ देशात शिंदे टॅापवर ; देशात ठाकरे, फडणवीस, पवारांनाही मागे टाकलं

सरकारनामा ब्युरो

पुणे : शिवसेनचे नेते, मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना आता काय करणार, उद्धव ठाकरे हे आव्हान कसं पेलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Eknath Shinde trending on Google)

शिंदे-ठाकरे मधील हा 'सामना' कोण जिंकणार, याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. 'एकनाथ शिंदे कोण आहेत' असा सवाल देशभर विचारला जात आहे. देशात महाराष्ट्रातील राजकारणाची चर्चा सुरु आहे. (Eknath Shinde news in Marathi)

शिंदेबाबत देशातच नव्हे तर पाकिस्तान, सौदी या देशांमध्येही उत्सुकता आहे. तीन दिवसापासून गुगुलवर (Google Trend) 'एकनाथ शिंदे' सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदेंविषयी अधिक माहिती नसल्याने गुगलवर त्यांच्याविषयी माहिती, व्हिडिओ, बातम्या अनेक जण सर्च करीत आहेत.

देशभरात शिंदेंचा तीन दिवसांतील सर्च ट्रेंड ६४ टक्के एवढा राहिलाआहे. ही संख्या १० लाखांपेक्षा अधिक आहे. पाकिस्तान, सौदी या देशांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी शिंदेंविषयी माहिती सर्च केली आहे.

एकनाथ,शिंदे, उद्धव ठाकरे, शिवसेना या घडामोडी महाराष्ट्राशी संबंधित असल्याने उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या तुलनेत देशात शिंदेंचा सर्च ट्रेंड ६४ टक्के आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिलंय. शिवसेनेत झालेल्या बंडामुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. २१ जूनला हे बंड पुकारण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे सगळे आमदार गुवाहाटीमध्ये गेले आहेत.

  • २१ जून रोजी दुपारी २.३० वाजता शिंदेंचा ट्रेंड टाॅपवर होता.

  • २२ जून राेजी ते सुरतहून गुवाहाटीला गेल्यानंतर हा ट्रेंड आणखी वाढला.

  • २२ जून राेजी दुपारी १२.३० वाजेपासून उद्धव ठाकरेंचा ट्रेंड सुरू होता.

  • बुधवारी पत्रकार परिषदेनंतर रात्री १०.३० वाजता ठाकरे सर्च ट्रेंडमध्ये एकनाथ शिंदेंच्या पुढे होते.

  • ३३ देशांमध्ये ३ दिवसांत पाच नेत्यांविषयी माहिती सर्च करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे सर्वात पुढे होते.

एकनाथ शिंदेंविषयी असा आहे अन्य देशांमध्ये ट्रेंड

पाकिस्तान- ५४ टक्के,

सौदी अरेबिया- ५७ टक्के,

मलेशिया- ६१ टक्के,

नेपाळ- ५१ टक्के,

बांगलादेश- ४२ टक्के,

थायलंड- ५४ टक्के,

जपान- ५९ टक्के,

कॅनडा- ५५ टक्के

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT