Dr. Amol Kolhe On Ajit Pawar: शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, अजून विधानसभा बाकी आहे करारा जबाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल, या शब्दात शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट आव्हान दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्या प्रचाराची सांगता सभा आज नारायणगावात पार पडली. या सांगता सभेत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट निशाणा साधत हल्ला चढवला. डॉ. कोल्हे म्हणाले, जेव्हा एक भूमिका घ्यायची वेळ आली होती, तेव्हा स्वार्थी लोकांच्या रांगेत जायचं नाही हे ठरवलं होत. दादा आपसे बैर नहीं, लेकीन बीजेपी की खैर नहीं हा आमचा बाणा आहे. ज्या भाजपने आमचा अपेक्षाभंग केला त्यांची तळी तुम्ही उचलत आहात अशा शब्दात कोल्हेंनी हल्लाबोल केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ते पुढे म्हणाले, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला 12 सभा घ्याव्या लागत असतील तर हा माझा गौरव आहे. माझं काम बोलत, म्हणून इथं अडकून पडावं लागलं. म्हणून आदरणीय दादांना विनम्रतेने सांगतो, साधं मांजर सुद्धा कोंडून मारायचा प्रयत्न केला तर प्रतिहल्ला करतं. मी तर शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, अजून विधानसभा बाकी आहे, करारा जबाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, जेव्हा कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल तर त्याची तयारी ठेवा, असं आव्हानचं कोल्हेंनी दादांना (Ajit Pawar) दिलं.
कडेवर घेतलेल्या उमेदवाराच्या प्रचारात पालकमंत्री व्यस्त आहेत. प्रचारातून बाहेर या आणि बिबट्याच्या प्रश्नांवर लक्ष द्या नाही. बिबट्याचा प्रश्न हा माझ्या माणसांसाठी गंभीर प्रश्न आहे, अस म्हणत बिबट्याच्या प्रश्नाकडे राज्यसरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षावरुनही डॉ. कोल्हे यांनी अजित पवारांना सुनावलं.
शिवाजीराव आढळराव पाटील हे संसदेत आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी संरक्षण खात्याविषयी कसे प्रश्न विचारत होते, हे डॉ. कोल्हे यांनी पुराव्यासह दाखवलं. त्यानंतर त्यांच्याकडून डॉ. कोल्हे यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. ही नोटीस जाहीर सभेत दाखवत, कोल्हे म्हणाले, "प्रश्न विचारले तेव्हा रामलिंग महाराजांची शपथ घेतली आणि सांगितल माझा काही संबंध नाही. मराठी माणूस उद्योगपती असल्याचा अभिमान आहे. पण महाराष्ट्रात भूमिहीन शेतमजूर जो भारतात असोत त्याचा अमेरिकेत बंगला असतो याचं गौडबंगाल कळलं नाही. कितीही नोटीस आल्या तरी त्याचा विचार करत नाही, कारण प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. जनहिताचे, लोकशाहीचे प्रश्न विचारत राहणार."
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.