Shivaji Adhalrao Patil Join NCP : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिलेदार आणि माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांनी आज (26 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून आढळराव-पाटील (Shivajirao Adharao Patil) हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
लोकसभा (Lok Sabha Election) निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीपासूनच राज्यातील शिरूर (Shirur) मतदारसंघाची चर्चा जोरदार सुरू होती. मात्र, या ठिकाणी महायुतीचा उमेदवार कोण असणार हे निश्चित झालं नव्हतं. कारण हा मतदारसंघ अजित पवारांकडे गेला होता आणि या जागेसाठी शिंदे गटाचे आढळराव-पाटील इच्छुक होते. त्यामुळे आढळरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर आम्ही त्यांना उमेदवारी देऊ, अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली होती. यावर युतीत एकमत झालं. त्यानंतर आढळरावांनी हातात घड्याळ बांधण्याचं ठरवलं आणि आज अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाने विद्यमान खासदार अमोल कोल्हेंची (Amol Kolhe) उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. दुसरीकडे महायुतीत शिरूरची (Shirur) जागा अजित पवार गटाला देण्यात आली आहे, तर अजित पवारांनी ही जागा शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांना देण्याचं निश्चित केलं आहे. त्यासाठीच आढळराव-पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी आज अजित पवार गटात जाहीर पक्षप्रवेश केला. त्यामुळे आता शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असा सामना रंगणार आहे.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.