Girish Mahajan- Sambhaji Bhide Sarkarnama
पुणे

Sambhaji Bhide Statement : संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर संकटमोचक महाजनांनी जोडले हात !

Sudesh Mitkar

Pune News : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी पुण्यामध्ये केलेलं एक वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. आपल्याला दळभद्री स्वातंत्र्य मिळालं आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे.

त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. याबाबत मंत्री आणि सरकारमधील संकट मोचक म्हटले जाणाऱ्या गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी यावर हात जोडून उत्तर देणे टाळले.

निर्मल वारी या उपक्रमासाठी गिरीश महाजन पुण्यात आले होते.त्यावेळी महाजनांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, सालाबाद प्रमाणे वारीला सुरुवात झाली आहे. 17 जुलैला या सर्वच दिंड्या पंढरपुरात जाऊन पोहोचणार आहे. वारी स्वच्छ, सुंदर, निर्मल आणि सुरक्षित होण्यासाठी सरकारने सर्व उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी पेक्षा अधिक निधी यावर्षी वारीसाठी सरकारने दिला आहे.गेल्या वर्षी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून 25 ते 30 कोटी निधी खर्च करण्यात आला होता. मात्र यावर्षी 50 कोटी हून अधिक निधी वारीसाठी खर्च करण्यात येत आहे.

आरोग्याच्या बाबतीत देखील गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट खर्च यंदा करण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सरकार सर्वोतरुपरी प्रयत्न करत आहे. यंदाच्या वर्षी वरुण राजाने चांगली सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात फक्त पाच टक्के प्रेरणा झाल्या होत्या. त्या ठिकाणी यावर्षी 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचा संकट टळल असून वरून राजा असंच बरसत राहू दे कुठेही अतिवृष्टी पडू देऊ नको, कुठेही दुष्काळ पडू देऊ नको, बळीराजाला सुखी आणि समाधानी ठेव, हेच साकडं विठुरायाच्या चरणी असणार असल्याचे महाजन यांनी सांगितलं.

एक रुपयाच्या पिक विमा साठी शंभर रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहे. यावरून विरोधक सरकार वर निशाणा साधत आहेत. याबाबत बोलताना महाजन म्हणाले, अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आलं असून स्थानिक प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतच्या सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. सरकार एक रुपयांमध्ये विमा देत असताना सीएससी सेंटर कडून जास्त पैसे आकारणे हे चुकीचे असून सरकार जर एक रुपयाने विमा देत असेल तर तो शेतकऱ्यांना एक रुपयाला पडला पाहिजे. नाहीतर नाकापेक्षा मोठी जळ अशी कुठेतरी परिस्थिती निर्माण होईल असं महाजन म्हणाले.

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्याबाबत एक वक्तव्य केले होते. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता. महाजनांनी माध्यमांसमोरच हात जोडत 'जय श्रीराम' म्हणत काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र माध्यमांनी पुन्हा एकदा त्यांना याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी बोलावलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळलं.

भुशी डॅम दुर्घटने वर बोलताना महाजन म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी प्रशासनासोबत घटनास्थळाला भेट देणार आहे. अद्यापही काही मृतदेह सापडलेले नाहीत. मात्र पर्यटकांनी काही प्रमाणात अशा प्रकारे धबधबे पाण्याच्या जवळ जाताना काळजी घेणं आवश्यक आहे. गेल्या काही काळापासून सेल्फी घेताना व्हिडिओ काढताना काही दुर्घटना घडल्याचे समोर आलो आहे. त्यामुळे प्रत्येकानेच आपली काळजी घेणे आवश्यक आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT