पुणे : शिवसेनेतल्या (shivsena) बंडाने राजकारण ढवळून निघालं. पण, आता लक्ष लागलंय ते बुधवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यांकडे. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना फुटून दोन मेळावे (Dasara Melava) होत आहेत. (Dasara Melava latest news)
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) ताकद दाखवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलीये. शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी नियोजन करण्यात आलंय. तसंच नियोजन उद्धव ठाकरेंकडूनही करण्यात आलंय. "धनुष्यबाण आमचाच," असा दावा दोन्ही गटांनी केला आहे.
पहिला मेळावा आहे, तो उद्धव ठाकरेंचा जो शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजीपार्क मैदानावर होणार आहे. तर दुसरा मेळावा आहे तो एकनाथ शिंदे यांचा. जो बीकेसी मैदानावर होणार आहे. अशात फ्लोरिडामधला एक कट्टर शिवसैनिक दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. ८० हजारांचं तिकिट काढून तो मुंबईत आला आहे. फ्लोरिडामध्येही त्याचे मित्र हा मेळावा पाहणार आहेत आणि नंतर हा शिवसैनिक त्यांना इंग्रजीत भाषांतर करून सांगणार आहे.
अक्षय राणे असे या तरुणाचे नाव आहे. तो मीरा रोड येथे राहतो. त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलं असून नोकरी निमित्त तो फ्लोरिडात येथे गेला अन् तेथेच स्थायिक झाला आहे. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणारा अक्षय हा दसरा मेळ्याव्यासाठी मुंबईत आला आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर "शिवसेनेतच राहा, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका," असे अक्षय आपल्या मित्रांना, शिवसैनिकांना फोन करुन सांगत होता.
सातासमुद्रापलिकडे लांब असलेल्या अक्षयचे शिवसेनेवरील प्रेम कमी झालेले नाही, "शिवसेना आमचीच," असा दावा दोन्ही गटाने केला असला तरी, 'शिवसेना माझीच'अशी भावना अक्षय राणे याची असल्याने दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे भाषण प्रत्यक्ष ऐकण्यासाठी हा शिवसैनिक चक्क ८० हजारांचं तिकिट काढून मुंबईत आला आहे.
हॉटेल मॅनेजमेंट करून अमेरिकेत नोकरीसाठी गेलेला मिरा रोडचा अक्षय राणे हा कडवट शिवसैनिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानणारा, मातोश्रीला पंढरी मानणारा मुलगा. शिवसेनेवर प्रेम करणारा अक्षय हा कालांतराने दुबईला, फ्रान्स, रशिया, इटली आणि आता फ्लोरिडा अश्या विविध देशात गेला. जगात अनेक ठिकाणी फिरला, पण शिवसेना आणि ठाकरेंची ओढ नेहमी घट्ट राहिली. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर अक्षय प्रचंड अस्वस्थ होता. साता समुद्रा पार असूनही त्याचा लक्ष इकडे होते. मित्रांना तिथून फोन करून सांगायचा कि, शिवसेने सोबतच रहा, उद्धवसाहेबांना सोडू नका. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार हे समजताच त्याने फ्लोरिडा मध्ये त्याच्या मित्रांना मिठाई वाटली. मिठाई वाटून तो इतक्यावरच थांबला नाही, दसरा मेळाव्याला काहीपण करून मी जाणारच हि त्याची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याने ऑफिस मध्ये भांडून सुट्टी घेतली आणि स्वखर्चाने ८० हजारांचे विमान तिकीट काढून फ्लोरिडा वरून थेट मुंबई गाठली.
त्याला एका मित्राने विचारले, "अरे तू दसरा मेळाव्यासाठी सुट्टी टाकून इतक्या लांब का आलास," तर तो म्हणाला, अरे कोविड ची भयानक परिस्थिती जगात सुरु असताना. अमेरिके सारख्या इतक्या प्रगतिशील देशात आम्ही हाहाकार उडालेला पाहिला आहे. तेव्हा माझा महाराष्ट्र, माझे कुटुंब, माझे मित्र यांना ज्या माणसाने आपल्या परिवारा सारखे सांभाळले, धीर दिला, संवाद साधला, काळजी घेतली त्या देवा समान माणसासोबत एक मराठी माणूस आणि महाराष्ट्र प्रेमी नागरिक म्हणून पाठिंबा द्यायला आलोय आणि एक मराठी माणूस म्हणून माझे कर्तव्य आहे,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.